पुणे दि ०१ :- ‘थर्टी फर्स्ट’ची रात्र ही सर्वसामान्य जनतेसाठी ‘सेलिब्रेशन’ची असली तरी पोलिसांना मात्र डोळ्यात तेल घालून जागरूक राहावे लागते. म्हणूनच राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख नववर्षाचे स्वागत पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता पुणे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून गृहमंत्री पोलीस दलाचा उत्साह वाढिवला आहे.
संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना पोलीस महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. म्हणूनच या क्षणी पोलिसांच्या सोबत राहण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी घेतला होता
सरत्या वर्षावर कोरोनाचे मळभ होते. आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी ‘होप २०२१’ असे लिहिलेला केक पोलीस सहकाऱ्यांसोबत कापला आहे व पुणेकरांची येणारे तक्रारीचे कॉल त्यांनी घेतले आहे नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, आपली काय तक्रार आहे? एका नागरिकांनी सांगितले की आमच्याकडे सोसायटीत खूप साऊंडचा आवाज जोरात सुरू आहे तो कमी करायला सांगा? त्यानंतर गृहमंत्री आदेश देतात, पुढच्या काही मिनिटात सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवसागर सोसायटीत पोहचतात आणि तेथील आवाज बंद होतो.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात जाऊन मध्यरात्री पोलिसांबरोबर नवे वर्षाचे स्वागत केले यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात आलेला फोन घेतला व तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतली. १२ वाजून २ मिनिटांनी ही तक्रार आली. पोलीस पुढील काही मिनिटात घटनास्थळी पोहचले होते. त्या अगोदर देशमुख यांनी सर्वांबरोबर केक कापला.यावेळी देशमुख म्हणाले, गेली १०
महिने पोलीस, डॉक्टर, परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस थकले जरूर आहेत. पण हिंमत हरलेले नाहीत. कोरोनविरुद्धच्या या लढाईत एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या बरोबर नव्या वर्षाची सुरुवात करायला मिळाली याचा मला आनंद आहे. तसाच आनंद त्यानाही झाला असेल. हे नवीन वर्ष निश्चितच कोरोनामुक्त असेल.व आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी ‘होप २०२१’ असे लिहिलेला केक देशमुख यांनी पोलीस सहकार्यांसमवेत कापला. इतक्या रात्री एखाद्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे गृहमंत्री पुणे शहर पोलीस आयुक्तालयात असण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग होता.