पुणे दि १० :-पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दि०८ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजय महावीर भुक्तर वय-१९ रा. सिद्धार्थ नगर, हिंगोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीकडून ५ लाखाचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. चोरीची घटना घडल्यानंतर विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेची अशी तीन पथके आरोपीच्या मागावर होती.व एल.टी.मार्ग पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्यांचे हद्दीत गस्त करीत असताना गुन्ह्यातील आरोपी हा संशयितरित्या मिळुन आल्याने त्याच्याकडे चौकशी करण्या करीता एलटीमार्ग पोलीस स्टेशन येथे आणले व इसमाकडुन शारदा गणपती मंदिर येथुन चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी अंदाजे १४.५ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रक्कम अंगझडतीत मिळुन आल्याने जप्त करण्यात आली .व पोलिसांना माहिती मिळताच तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ एल.टी.मार्ग पोलीस स्टेशन येथे जावुन सदर गुन्ह्यातील आरोपीस पुढील कारवाई करीता ताब्यात घेतले व विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील तपासपथक व एल.टी.मार्ग पोलीस स्टेशन , मुंबई यांनी अखेर आरोपीला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि.७ मध्य रात्रीच्या सुमारास मंदिरातील सभामंडपाकडे जाणाऱ्या मागील बाजुच्या दरवाजाचे कडी कोयंडा कटावणीने उचकटून चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने श्री शारदा गजानन मुर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसुत्र असा पंचवीस तोळ्यांचे दागिने चोरून नेले. मंदिराचे पुजारी शुक्रवारी सकाळी नित्यपुजेसाठी मंदिरात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराचा मार्ग काढण्यास सुरुवात केली.दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट एकची दोन पथके मुंबईत आरोपीच्या मागावर पाठवण्यात आली. पथकातील पोलीस कर्मचारी लहामगे, चव्हाण, वाडेकर, जाधव, महाजन, गुजर, खांडेकर हे मुंबईतील दागिना बाजार येथील धनजी स्ट्रीट नाका परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मंडईतील मंदिरात चोरी करणारा आरोपी त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लोहमार्ग विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखील आरोपीला बेड्या ठोकल्या. सदर कामगिरी परिमंडळ १ चे पोलीस उप – आयुक्त श्रीमती प्रियांका नारनवरे , सहा . पोलीस आयुक्त . टोम्पे , विश्रामबाग विभाग अतिरीक्त कार्यभार यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विजय टिकोळे व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ). कुंडलीक कायगुडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय जाधव तसेच पोलीस अंमलदार बाबा दांगडे , धीरज पवार , प्रशांत शिंदे , सताप्पा पाटील , हेमंत पालांडे सर्व नेमणुक विश्रामबाग पोलीस ठाणे , पुणे यांनी केली आहे . गुन्हयाचा पुढिल तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडिल पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री कुंडलीक कायगुडे हे करीत आहेत .