• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शंभर पेक्षा जास्त घरफोडी करणारा फरार आसलेला आरोपी चतुर्श्रुंगी पोलिसांनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १३ :- औंध परिसरात घरफोडी करून पोलिसांसमोरूनच पसार झालेल्या चारपैकी एक  मुख्य गुन्हेगाराला पकडण्यास चतुर्श्रुंगी पोलिसांना यश आले आहे. हडपसर परीसरात रामटेकडी येथील जंगलात पाठलाग करीत हडपसर आणि चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातील १३ पोलीस कर्मचारी व २ अधिकारी व हडपसर पोलीस स्टेशनचे २ पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. चोरट्याकडे ब्लेड आणि धारदार शस्त्र असतानाही जिवाची पर्वा न करता पोलिसांनी त्याला अटक केली.बिरजूसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्यावर घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे सुमारे १०० गुन्हे दाखल आहेत दि .२८ / १२ / २०२० रोजी पहाटे ०२/४५ बा चे सुमारास चार आरोपी यांनी शैलेश टॉवर सिदधार्थ नगर फेज ३ जवळ , औध , पुणे या ठीकाणी रात्रीचे वेळी चार चाकी वाहनातुन येवुन तेथील वॉचमनला मारहान व चाकुचा धाक दाखवुन जिवे

मारण्याची धमकी देवुन सोसायटी मधील एकुण ०५ फ्लॅटचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडुन आत मध्ये प्रवेश करून एलईडी टिवी चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करून चोरटे घरफोडी करत असल्याची कुणकूण लागल्याने सोसायटीतील कोणीतरी ही बाब पोलिस नियंत्रण कक्षास फोनद्वारे कळवली. त्यानंतर थोड्या वेळात दोन पोलिस त्या ठिकाणी दुचाकीवर आले, परंतु परंतु चोरटे शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या समोरून पळून गेले होते जबरी चोरी करणारे चोरट्यांची माहिती चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील तपास्पथकातील अधिकारी व अमलदार हे माहिती काढत त्यांनी घटनास्थळावर मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हयातील वापरलेली काळे रंगाची सॅन्ट्रो कार या वरून आरोपींचा मार्ग काढत असताना आरोपीची सॅन्ट्रो कार ज्या मार्गाने गेली त्यामार्गाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून गाडीचा मार्ग काढून आरोपी हे शिकलगरी असल्याचे संशय बळावलेने शिकलगरी टोळीचे या पुर्वीचे फुटेज व आत्ताचे पुटेज तपासून सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी , सनीसिंग पाप्पासिंग दुधानी , बिर्सिग शामसिंग कल्याणी ,

लखीसिंग गब्बरसिंग टाक सर्व राहणार रामटेकडी , हडपसर , पुणे यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे पंकन देशमुख , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , सहा पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांना देवून त्यानी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस उप निरीक्षक महेश भोसले , मोहन जाधव , अमलदार दिनेश गडाकुश मुकूद तारू प्रकाश आव्हाड , श्रीकांत वाचवले संतोष जाधव मारम साळवी प्रमोद शिंदे , आशिष निमसे जानेचर मुळे , मारुती पारधी वसिम सिद्दीकी , नेजस चोपडे , अमोल जगताप यांची टिम तयार करून आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असताना दि ०२/०१/२०२१ रोजी गोपनीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की , चतुःशृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं. मधील पाहिजे असलेला आरोपी बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी हा त्याचे टोळीतील साथीदारासह रामटेकडी डॉगर येथे असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहे व ते कोठेतरी गुन्हा करण्यास जाण्याचे तयारीत आहेत.अशी माहिती प्राप्त झालेने पोलिस अधिकारी व अमंलदार यांच्या दोन टिम तयार करून मदतीकरिता हडपसर पो.स्टेकडील अमलदार धुमाळ व शेख यांना घेवून सदर आरोपीना रामटेकडी येथे घेराव घातला असता आरोपीने बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी , याने त्याचेकडील रेम्बो चाकू ( खंजीर ) याने पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांचेवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला मात्र त्यांनी प्रसंगावधान राखुन तो वार वाचविला तसेच इतर तिन इसमांनी त्यांचेकडील शस्त्रे अंगावर उगारून दरीमध्ये उडी टाकून पळून गेले व तसेच आरोपी बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी , वय ३७ वर्षे , रा रामटेकडी अंध शाळेच्या मागे , हडपसर , पुणे.यास काबुत आणण्याचा प्रयत्न करीत असता त्याने त्याची अटक टाळणेकरिता त्याचे जवळील ब्लेडने स्वतःचे पाटीवर व हातावर ब्लेडने वार करून स्वतःस जखमी करून घेतले व पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांना सदर आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी आरोपीविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेने वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.व आरोपीस उपचार करून गुन्हयात अटक करून तपास करता त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केलेल्या गुन्हयात वापरलेली सॅन्ट्रो कार काळे रंगाची नं . MH.14.AM.5336 ही जप्त करण्यात आली आहे. आरोपीने चोरलेली टीव्ही ही फोडून टाकलेचे ठिकाण दाखवले आहे व टिव्ही स्क्रीन मिळून आल्याने ती जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून गुन्हयात वापरलेला रेम्बो चाकू ( खजीर ) व ब्लेड जप्त करण्यात आले आहे . धरफोडी व जबर चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेश भोसले हे करीत आहेत . सदर कारवाई ही मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता . सह पोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पश्चिम प्रादेशीक विभाग तसेच पोलीस उप – आयुक्त गुन्हे . परिमंडळ ४ व सहा पोलीस आयुक्त -०१ , सहा . पोलीस आयुक्त , चतु श्रृंगी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली चतु श्रृंगी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व स्टाफ व गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी य स्टाफ यानी केली आहे .

Previous Post

ग्रामपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यास मनाई

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्त यांचा सायबर पोलीस ठाण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय …

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्त यांचा सायबर पोलीस ठाण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय ...

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist