पुणे ग्रामीण दि २० : – शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे एका तरुणावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना घडली होती.व दुचाकीवरुन आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात स्वप्निल छगन सणसिंग (वय-३०) याचा गोळ्या घालून खून केला. होता व या प्रकरणातील दोन आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.सदर गुन्हा हा पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी व वाळू माफिया यांचे वादातून व उसने पैशांच्या कारणावरुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तपासाबाबत शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हयाचा समांतर तपास करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमणे ही घटना सोमवारी दि.१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती.विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय-२५), आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे (वय २४ दोघे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी टाकळी हाजी येथील सर्कल कार्यालयासमोर होंडा शाईन मोटार सायकलवर येवून पिस्तुलामधून गोळया झाडुन स्वप्नील रणसिंग याचा खुन केला. खुन केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौकातून साध्या वेशात सापळा रचून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे व अटक केली.आहे पुढील अधिक तपासकामी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहेत. यातील आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशनला मारामारी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे आणखीन कोणी साथीदार आहेत काय? याबाबतचा अधिक तपास आरोपींची मेहरबान कोर्टाकडून पोलिस कस्टडी रिमांड घेऊन शिरूर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करीत आहेत
सदरची कामगिरी.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,
सपोनि. पृथ्वीराज ताटे, सपोनि. नेताजी गंधारे,पोसई. अमोल गोरे,सफौ. दत्तात्रय गिरमकर,सफौ. राजेंद्र थोरात,सफौ. दत्तात्रय जगताप,सफौ. शब्बीर पठाण,पोहवा. विद्याधर निचित,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. विक्रम तापकीर,पोहवा. जनार्दन शेळके,
पोहवा. काशिनाथ राजापुरे,पोहवा. प्रमोद नवले,पोना. राजू मोमीन,पोना. मंगेश थिगळे,पोना. दिपक साबळे,पोशि. संदीप वारे,पोशि. अक्षय नवले,पोशि. अक्षय जावळे,पोशि. प्रसन्न घाडगे, यांनी केलेली आहे.