पुणे दि २१ :- सासवड परिसरात मोजणी झालेल्या जमीनीची हद्द कायम करुन देण्यासाठी पुरंदर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपिक आणि एका खासगी इसमाला 3 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.नगर भूमापन लिपिक प्रमोद गणेश तुपे (वय-३२) आणि खासगी इसम नवनाथ पांडुरंग मेमाणे (वय-३०) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी झाली असून जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी तुपे आणि मेमाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून लिपिक प्रमोद तुपे आणि खासगी इसम नवनाथ मेमामे यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सासवड पोलीस स्टेशन , पुणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास श्रीमती ज्योती पाटील , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली व शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ ,