पुणे ग्रामीण दि ०१ : – पुणे दौड परिसरातील एमएसईबीच्या कनिष्ठ अभियंत्या १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.राहुल श्रीरंग लकडे (वय 32) असे पकडलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडे हे लोकसेवक असून, ते दौड तालुक्यातील पिंपळगाव शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून नेमणुकीस आहेत.यातील तक्रारदार यांच्या शेतात पोल्ट्रीसाठी (कुक्कुटपालनासाठी) विद्युत कनेक्शन देण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत त्यांनी एमएसईबीकडे अर्ज केले होते. यावेळी लोकसेवक लकडे यांनी त्याचे कोटेशन बनवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज केलेल्या सापळा कारवाईत 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १०६४ क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन . राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० ५.