पुणे दि १३ :- येरवडातील गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. टोळी प्रमुख मधील मुख्य सुत्रधार व येरवडा पोस्टे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १.आकाश वसंत कनचिले २.कुणाल किसन जाधव उर्फ राज्या ३. अभिषेक नारायण खोंड उर्फ अभय पाटील ४. अक्षय सतिश सोनवणे ५. आकाश उर्फ टक्या भगवान मिरे ६. अर्जुन दशरथ म्हस्के ७. राजविर रणजीतसिंग सौतरा ८. चेतन राजू भालेराव ९ . आकाश संजय सपकाळ १०. निलेश लक्ष्मण पुंड ११. गणेश उर्फ नेप्या बापु आडसुळ १२. लक्ष्मण उर्फ सोनू शिवाजी गजरमल १३. रिपेन्स रॉबर्ट चिनाप्पा १४. प्रज्वल उर्फ पज्या बापु कदम १५. ओंकार युवराज सोनवणे १६. सौरभ संभाजी डोलारे , नितीन कसबे खुन प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायदयान्वये कारवाई केली आहे दि २७/०५/२०२० रोजी २२-४५ वा.चे सुमारास नितीन शिवाजी कसबे वय २४ वर्षे रा . स . नं . १२. भिमज्योत मित्र मंडळ जवळ , लक्ष्मीनगर , येरवडा , पुणे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोरोना विषाणु संसर्ग अनुषंगाचे लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करुन त्याचेवर वार करुन तसेच दगड , बाटलीने , व लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यास गंभीर जखमी करुन , जिवे ठार मारले म्हणून येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हयामध्ये आरोपींना अटक करण्यात आलेली आहे . सदर आरोपींना अटक करुन त्यांचेकडे सखोल तपास पोलिसांनी केला असता सदर अटक आरोपींचा आकाश वसंत कनचिले हा मुख्य व टोळीप्रमुख आरोपी असून त्याचे सांगण्याप्रमाणे इतर आरोपी काम करीत असल्याचे निष्पन्न झाले असून नितीन शिवाजी कसबे हा दि २७/०५/२०२० रोजी २१-०० वा.चे सुमारास पॅरोल रजेवर सुटल्यानतर टोळी वर्चस्वाचे वादावरुन त्यास २२-४५ वा.चे सुमारास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे . दाखल गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख , येरवडा पोलीस स्टेशन यांनी पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त , परीमंडळ २. यांचे मार्फत नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाचे छाननी केल्या नंतर सदर गुन्हयातील आरोपी हे आकाश वसंत कनचिले यांच्या टोळीचे सदस्य म्हणुन काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे . टोळीप्रमुख आकाश कनचिले व त्याचे वर नमुद टोळीचे सदस्य आरोपींनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केलेला आहे . आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करुन एकटयाने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरीता व त्यातून गैरवाजवी व आर्थीक व इतर फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत.सदर संघटीत गुन्हेगारी टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी त्यांचे टोळीच्या अन्य सदस्यासाठी गैरवाजवी आर्थीक फायदा तसेच आपल्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले आहे . टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुन , खुनाचा प्रयत्न , गंभीर दुखापत , जखमी करुन जबरी चोरी , घातक शस्त्र बाळगणे इत्यादी सारखे गुन्हेगारी कृत्य आरोपींनी सातत्याने केलेले आहे . सदर आरोपी यांनी संघटीत टोळीचे माध्यमातून गुन्हा केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १ ९९९ चे कलम -३ ( १ ) ( i ) . ३ ( २ ) , ३ ( ४ ) , या कलमांचा समावेश करणेबाबत.नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त साो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी मंजुरी दिलेली आहे . त्याप्रमाणे येरवडा पोलीस स्टेशन येथे या गुन्हयामध्ये मोक्का कायदयाची कलमे समाविष्ठ करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास.किशोर जाधव सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर हे करीत आहेत.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वत भेट देऊन कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तिक मार्गदर्शन करुन गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्यांचे मार्गदर्शना खाली मोका अंतर्गत केलेली ही ७ वी कारवाई असून यावर्षातील ही चौथी कारवाई आहे ,