पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 1 हजार 793 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 17 : पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 1 हजार 793 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 517 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 93 हजार 869 रुग्णांपैकी 3 लाख 79 हजार 976 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.47 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 449 रुग्णांपैकी 54 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 735 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 838 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 57 रुग्णांपैकी 49 हजार 537 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 700 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 820 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 297 रुग्णांपैकी 46 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 117 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 121 रुग्णांपैकी 48 हजार 260 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 130 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 638, सातारा जिल्ह्यात 41, सोलापूर जिल्ह्यात 39, सांगली जिल्ह्यात 9 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 692 आहे. पुणे जिल्हयामध्ये 523, सातारा जिल्हयामध्ये 111, सोलापूर जिल्हयामध्ये 27, सांगली जिल्हयामध्ये 14 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 17 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 72 हजार 97 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 1 हजार 793 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)