पुणे दि १८ :- तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्या गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर पुणे शहर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे , अवैदय कारवाया तसेच लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्या संदर्भातील धोरण स्विकारले आहे व त्यासंदर्भात आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत. दि .१५ रोजी रात्रौ २०/३० ते २१/३० वा . दरम्यान वारजे पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी पो.अंमलदार असे हददीत स्टाफसह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पुणे बेंगलोर हायवेवरील चांदणी चौक येथे सराईत गुन्हेगार गजानन मारणे याने त्याचे साथीदार यांचेसह चांदणी चौक मुंबई बेंगलोर हायवे येथे कायदयाचे उल्लंधन करुन गैरकायदयाची मंडळी जमवून घेवून जात असताना वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांना थांबवून कोव्हिड -१ ९ च्या अनुशंगाने परवानगी घेतली का याबाबत विचारणा केली असता यातील आरोपी संतोष शेलार याने वाहनामधुन हात काढुन सपोनि रायकर यांना हाताने बाजुला ढकलुन देवून न पुढे निघून गेले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार गजानन मारणे व त्याचे इतर समर्थक यांनी दहशत निर्माण करीत पुणे बेंगलोर हायवेवरील चांदणी चौक येथून कोथरुडच्या दिशेने न थांबता निघून गेले जमावबंदी आदेशचे उल्लंघन करुन कोवीड १९ सारख्या भयंकर जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने तोंडाला मास्क न लावता सुरक्षित अंतर न ठेवता आजाराचा प्रसार करण्यास मदत केली म्हणुन आरोपींविरुध्द गुन्हा रजि.नं. भादवि कलम ३५३,१८८,२६८,२६ ९ , १४३,१४ ९सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( बी ) , साथरोग अधिनियम १८ ९ ७ कलम ३ , क्रिमीनल लॉ अमेंटमेंट कायदा कलम ७ , सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयामध्ये १ ) गजानन पंढरीनाथ मारणे २ ) प्रदिप दत्तात्र्य कंधारे ३ ) बापु श्रिमत बागल ४ ) आनंता ज्ञानोबा कदम ५ ) गणेश नामदेव हुडारे ६ ) रुपेश कृष्णराव मारणे ७ ) सुनिल नामदेव बनसोडे ८ ) श्रीकांत संभाजी पवार ९ ) सचिन आप्पा ताकवले १० ) संतोष शेलार यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील कार्यवाही करण्यात येत आहे . अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेवून दहशत निर्माण करत असेल त्यांची गय केली जाणार नाही त्याच्यावर कायदयाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल .