पुणे दि १८ :- पुणे परिसरात वारजे माळवाडी येथे गुन्हे शाखेच्या युनिट -३ कडील पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ जणांना ताब्यात घेतले . ही कारवाई वारजे – रामनगर रोडवरील मोकळ्या जागेमध्ये जुगाड घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , युनिट -३ कडील पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री निवास घाडगे यांना गोपनीय बातमी दाराकडून गुन्हे शाखा युनिट -३ कडील पोलिसांनी छापा टाकून कल्याण मटका नावाचा जुगार घेणाऱ्या व जुगार खेळणाऱ्या अशा एकूण चारजणांना ताब्यात घेतले . त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह एकूण ४ हजार २५ रु.चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . व वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे , गुन्हे -१ चे सहा . पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे , अंमलदार एकनाथ कंधारे , दीपक मते , अनिल शिंदे , राजेंद्र मारणे , रामदास गोणते , हनुमंत गायकवाड , प्रकाश कट्टे यांनी केली आहे .