संगमेश्वर दि २१ :- तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील जनार्दन येडगे यांना शिवछत्रपती आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जनार्दन येडगे यांनी कोरोना काळात मुंबईत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. संजीवन शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५१ जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संस्थेच्या शिवछत्रपती गुणीजन गौरव सोहळ्याचे २१ फेब्रुवारी रोजी मालपाणी लाॅन्स नाशिक रोड जि.अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते पुरस्काराचे वितरण विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी युथ आयडॉल पुरस्कार सत्यजित दादा तांबे, शिवछत्रपती कृषिकन्या पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे , समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार सुभाष सांगळे, शिवछत्रपती समाजप्रबोधन रत्न पुरस्कार अनिल केंगार ,युवा नारी रत्न जीवनगौरव पुरस्कार माधुरी इंदोरे अशा अनेक क्षेत्रातील नामांकित ५१ जणांना शिवछत्रपती गुणीजन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,बीजमाता तथा पद्मश्री राहिबाई पोपरे, विधानपरिषद सदस्य सुधीर तांबे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, वरुडी – मोशी मतदार संघ, माजी आमदार देवेंद्र भुयार, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई शिंदे ,माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिक्षण प्रसा.संस्थेचे अध्यक्ष संजय मालपाणी, संचालक इंद्रजित थोरात,विश्वस्त अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या शरयुताई देशमुख, संचालक नितेश कराळे ,संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे उपाध्यक्ष गणेश तान्हाजी बाळे, सचिव गोरक्षर चांगदेव भवर , युवा व्याख्याते प्राध्यापक निलेश पर्बत यांच्या प्रमुख दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे