पुणे दि २४ :- मंत्रालय मुंबई येथे आज बुधवार दिनांक २३ रोजी महाराष्ट्र राज्याचे क्रिडा व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या दालनात यांच्या दालनात लोहगाव मध्ये क्रिडा संकुल व हरणतळे येथील ‘ब’ वर्ग असेले पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली. लोहगाव स.नं.३५ मधील क्रिडा संकुल साठी लागणारे क्षेत्र मापून ते संरक्षण भिंत बांधून सुरक्षित करणे, तसेच राज्य शासनाचे नामनिर्देशित वास्तुविशारद मार्फत लवकरच आराखडा तयार करुन या संबंधित प्रसताव सादर करण्याचे निर्देश मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. तसेच हरणतळे येथे पर्यावरणचे समतोल राखून जल क्रिडा क्रियाकलापचा प्रसताव सादर करण्याच्या सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या. या बैठकीची मागणी आमदार सुनिल टिंगरे यांनी मागील काही दिवसांपूर्वी राज्य मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देऊन केली होती. ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या क्रिडा व पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तसेच या बैठकीला आमदार सुनिल टिंगरे, पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी संतान, हवेेेेलीचे भूमापन अधिकारी गौरकर, पुणे मनपा उपायुक्त घगे, हवेलीचे तहसीलदार कोळी, लोहगावचे तलाठी पोळ, मंत्रालय मधील क्रिडा व पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.