पुणे दि २५ : – फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली बंधनकारक केली असतानाही खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट उघडकीस आले आहे.
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर १९० रुपयेची टोल पावती असताना १०० रु घेऊन वाहनचालकांना टोलपावती न देता सोडून दिले जात असलेबाबत पोलीस अधीक्षक कार्यलयात तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता तसेच टोल नाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालक व शासनाची फसवणूक केली जात असल्याचे एका तरुणाच्या लक्षात आल्यानंतर सदर बाबतची ऑनलाइन तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिनांक 16/2/2021 रोजी खेड शिवापुर तसेच आणेवाडी टोल नाक्यातुन त्यांना टोल संदर्भात मिळालेल्या पावत्या या बनावट देत असल्याचा खात्री आल्याने त्यांनी त्या बाबत डाॅ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी कारवाई चे आदेशा नुसार व अपर पोलीस अधीक्षक,बारामती विभाग याचे मार्गदशनाखाली.पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक याचे अधिपत्याखाली खालील नमुद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन खात्री करून खेड शिवापुर तसेच आणेवाडी टोल नाका येथे छापा घातला असता सदर ठिकाणी इसम नामे (1) सुदेश प्रकार गंगावणे वय र्वो 25 रा. वाई, धुम काॅलनी,ता.वाई जि.सातारा (2) अक्षय तानाजी सणस वय वर्शे 22 रा. वाई, नागेवाडी, ता.वाई जि.सातारा (3) शुभम सिताराम डोलारे वय वर्शे 19 रा. जनता वसाहत पुणे (4) साई लादुराम सुतार वय वर्शे 25 रा. दत्तनगर कात्रज पुणे (5) हेमंत भाटे (6) दादा दळवी (7) सतिश मरगजे (8) संकेत जयवंत गायकवाड वय वर्शे 23 रा. सर्जापुर ता.जावळी जि.सातारा (9) अजय काशिनाथ चव्हाण वय वर्शे 19 रा. पाचवड ता.वाई जि.सातारा हे एकत्रीत रित्या संगनमताने PSTRPL कंपनीने छापलेल्य ओरिजनल पावत्याप्रमाणे डुप्लीकेट पावत्या तयार करून त्या पावत्या वाहन चालकांना देवुन स्वतः आर्थिक फायदा करून शासनाची तसेच टोलनाका चालकांची फसवणुक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचे ताब्यात 5 हजार 700 रू. किंमतीच्या डुप्लीकेट एकुण 30 पावत्या तसेच डुप्लीकेट पावत्या देवुन जमा झालेली एकुण रक्कम 32 हजार 70 व मोबाईल फोन, तसेच बनावट पावत्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन संगणक तसेच दोन प्रिन्टर, बनावट पावत्या तयार करण्यासाठी वापरण्यासाठी आलेला कागदी रोल असा एकुण 70 हजार600 रू. जप्त करण्यात आला आहे गुन्हा दाखल करणेत आला असुन वरील नमुद आरोपीताना त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या डुप्लीकेट पावत्या, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन, प्रिन्टर,संगणक असे राजगड पोलीस स्टेशनला हजर करणेत आले असुन नमुद आरोपीताविरूध्द राजगड पेालीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट याचे मार्गदर्शनाखाली नेताजी गंधारे सहा.पोलीस निरीक्षक
अमोल गोरे पोलीस उप निरीक्षक, शाबीर पठाण सहा.पोलीस उप निरीक्षक, ज्ञानेश्वर क्षिरसागर पोलीस हवालदार, हनुमंत पासलकर पोलीस हवालदार,चंद्रकांत जाधव पोलीस नाईक,अमोल शेडगे पोलीस शिपाई, बाळासाहेब खडकेपोलीस शिपाई,मंगेश भगत पोलीस शिपाई, प्रसन्ना घाडगे पोलीस शिपाई, अक्षय जावळे पोलीस शिपाई, दगडु विरकर पोलीस शिपाई…
याचे पथकाने केली