श्रीगोंदा दि २६;:- श्रीगोंदा तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपुर्वी कुकडीचे आर्वतन सोडण्यात आलेले आहे. परंतु श्रीगोदा तालुक्यातील विसापुर,मोहरवाडी व पारगांव येथील तलावामध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. मोहरवाडी व पारगांव तलाव हे पूर्णपणे कोरडे असून, सदरच्या तलावांमधुन अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने व वरील गावांतील शेतक-यांच्या फळबागा व इतर पिके या तलावातील पाण्यावर अवलंबुन असुन पाणी नसल्याने सदरची पिके शेतक-यांच्या डोळयासमोर जळून चालली असून यामध्ये शेतक-यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान चालू आहे. तरी सदरचे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत.राजकीय मंडळींच्या धोरणामुळे दुष्काळी गावांना त्यांच्या कुकडीच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सदरच्या तलावात पाणी सोडण्याची कार्यवाही करुन पूर्ण क्षमतेने तलाव न भरल्यास दिनांक १/३/२०२१ रोजी उपविभागीय अभियंता कुकडी कार्यालयासमोर विसापुर,कोळगांव,पारगांव येथील हजारो शेतकरी व ग्रामस्थांसह उपोषण करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड व शहाजी त्रिबक हिरवे यांनी दिला आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे