• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घायवळ टोळीचा म्होरक्या निल्या घायवळच्या पुणे ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०३ : – पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड, सध्या रा.सोनेगाव ता. जामखेड जि. नगर) याला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व भिगवण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. २) रात्री उशीरा जामखेड येथील घऱातून ताब्यात घेत त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली आहे.पुण्यातील गॅंगस्टर गज्या मारणेवरील पोलिसांची कारवाई गाजत असतानाच, ग्रामिण पोलिसांनी गज्या मारणे याचा प्रतिस्पर्धी गुंड निलेश घायवळ टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख सो. यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाईच्या. अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टार नामे निलेश बन्सीलाल घायवळ वय ४४ वर्षे, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एमपीडीए)

कायदयातंर्गत.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेमार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख सो. यांनी निर्णय घेवून निलेश घायवळ यास एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिलेले आहेत.
घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यास.पोलीस अधीक्षक. यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून जामखेड जि.अहमदनगर येथून ताब्यात घेवून आज पासून एक वर्ष स्थानबध्द करणेसाठी येरवडा मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे.
स्थानबध्द करण्यात आलेला गुन्हेगार निलेश घायवळ याचेविरुध्द यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, गंभीर दुखापत मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सुमारे ३ महिन्यापूर्वीच निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक.अभिनव देशमुक, पुणे विभाग अपर पोलिस अधीक्षक.विवेक पाटील., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पो.स्टे.चे सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक सचिन काळे, पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, रामेश्वर धोंडगे,
सहा.पोलिस उपनिरीक्षक दतात्रय जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे, इन्क्लाब पठाण, अंकुश माने यांनी केलेली आहे.
आगामी काळात पुणे जिल्हयातील वाळू तस्कर, बेकायदा सावकारी करणारे, धोकादायक इसम, मटका किंग, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांचे विरुध्द एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार असल्याचे संकेत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. गँगस्टार गजा मारणे याचा प्रतिस्पर्धी निलेश घायवळ याच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी ही कारवाई करताना अत्यंत गोपनीयता बाळगली होती.पुणे शहर पोलीस गँगस्टार गजा मारणे याच्यावर काय कारवाई करतात याची उत्सुकता सर्वांना आहे.

Previous Post

सारसबाग खाऊ गल्ली ते पेशवे पार्क रोडवर दोन्ही बाजूस नो-पार्कींग झोन

Next Post

राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर १७ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा : श्रीनगर येथे ५ मार्चपासून स्पर्धा

Next Post

राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर १७ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा : श्रीनगर येथे ५ मार्चपासून स्पर्धा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist