पुणे दि ०९ : – चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या व वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीवर पुणे शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. आठ जणांच्या टोळीला हा मोक्का लावला असून, त्यातील 5 जणांना अटक केली आहे. चतुःश्रुगी पोलीस स्टेशन हद्दीत पांडवनगर येथे टोळक्याने रिक्षा चालकावर वार करत तोडफोड केली होती.जयेश विजय लोखंडे (वय 20, रा. जुना बाझार), निखिल विजय कुसाळकर (वय 22, रा. दीप बंगला चौक), रोहित सुरेश धोत्रे (वय 21, रा. जुनी वडारवाडी), सुबोध अजित सरोदे (वय 20, रा. पांडवनगर) व जितेंद्र संजय जंगम उर्फ गोहिरे (वय 31, रा. पांडवनगर) अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांना अटक केली असून, चौघे पसार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.गेल्या आठवड्यात मध्यरात्री यातील 35 वर्षीय रिक्षा चालक घराबाहेर लावलेल्या गाडीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी 4 गाड्यावर हातात कोयते, गज, काठ्या घेऊन टोळके आले. त्यांनी फिर्यादी यांना धमकावत तुझ्याकडे इतक्या गाड्या आहेत, तू आम्हाला हप्ता द्यायचा. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत बेदम मारहाण केली. तर त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली.
याप्रकरणी त्यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या पाच जणांना अटक केली होती. दरम्यान वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी त्या प्रस्तवाची छाननी करत तो अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. जयेश लोखंडे हा टोळी प्रमुख असून, या टोळीने जमाव जमवणे, दंगा घालणे यासारखे गुन्हे केले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास किशोर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग , पुणे शहर हे करित आहेत. अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कारभार घेतले नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन गंभीर गुन्ह्याचे ठिकाणी स्वतः भेट देवुन कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तिक मार्गदर्शन करुन गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली हि ९ वी कारवाई करण्यात आलेली आहे .