पुणे दि ०९ :- पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी टोळयांना दणका घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ व इतर सदस्य यांचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) अंतर्गत कारवाई करुन टोळी प्रमुख निलेश घायवळ यास पुणे शहर पोलीसांकडून अटक पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी सर्व पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सक्रीय गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करणेचे निर्देश प्राप्त झालेले होते. व पुणे परिसरातील कोथरुड या ठिकाणी राहणाऱ्या राहणा एका गॅरेज चालक इसमाकडून भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहीजे असे म्हणून जबरदस्तीने निलेश घायवळचा प्रमुख हस्तक संतोष धुमाळ रा.भूगाव व अक्षय गोगावले , विपुल माझीरे , कुणाल कंधारे , मुसाब शेख व इतर ०३ हस्तक यांनी किं.रु .३ लाखाची महिंद्रा कंपनीची ५५० मॉडेलची जीप ही जबरदस्तीने त्यास चॉपरचा धाक दाखवून धमकावून नेलेबाबत वरील इसमांविरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.दाखल गुन्हयाचे तपासामध्ये टोळी प्रमुख निलेश घायवळ व त्याचे टोळीचे नमूद सदस्य आरोपी यांनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे . दाखल गुन्हयातील आरोपीतांनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करुन एकट्याने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरीता व त्यातुन गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत . सदर संघटीत गुन्हेगारी टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी त्याचे टोळीच्या अन्य सदस्यासाठी गैरवाजवी आर्थिक फायदा तसेच आपल्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठेवलेले आहे . टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुन , खुनाचा प्रयल , गंभीर दुखापत , जखमी करुन जबरी चोरी , घातक शस्त्र बाळगणे इत्यादी सारखे गुन्हेगारी कृत्य आरोपीतांनी सातत्याने केलेले आहे . आरोपी निलेश घायवळ याचे विरुध्द पुणे शहर , पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीणमध्ये खून – ०२.खुनाचा प्रयत्न -०३ , दरोडा -०२ गंभीर दुखापत -०१ , खंडणी -०२ , अपहरण -०१ असे एकूण -१४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपी यांनी संघटीत टोळीचे माध्यामातुन गुन्हा केलेला असल्याने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांचेकडून दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) या कलमाचा समावेश करणेबाबत अहवाल मा.पोलीस उप – आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचेमार्फत . अपर पोलीस आयुक्त . गुन्हे पुणे शहर यांना सादर करण्यात आलेला होता , त्यास . अपर पोलीस आयुक्त. गुन्हे पुणे शहर यांनी मंजुरी दिलेली आहे . त्याप्रमाणे कोथरुड पोलीस स्टेशन गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहे . सदर गुन्ह्याचा तपास डॉ.शिवाजी पवार , सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा , पुणे शहर हे करीत असून त्यांनी सदर गुन्हयाचे तपासामध्ये यातील आरोपी निलेश घायवळ यास आज दिनांक ० ९ / ०३ / २०२१ रोजी अटक केलेली आहे . सदरची कामगिरी ही.पोलीस आयुक्त पुणे शहर.अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , पुणे शहर.रवींद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) . अशोक मोराळे , पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा – २.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड , श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार जगन्नाथ भोसले , संपत अवचरे , राजाभाऊ बोर्डे , महेश पवार , विजय गुरव , प्रदिप शितोळे , विनोद साळूके , राहुल उत्तरकर , सचिन अहिवळे , शैलेश सुर्वे , सुरेंद्र जगदाळे , अमोल पिलाणे , संग्राम शिनगारे , मोहन येलपले , भूषण शेलार , प्रदिप गाडे , प्रविण पडवळ , चेतन शिरोळकर , आशा कोळेकर , सर्व नेमणूक गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केलेली आहे .