पुणे दि १२ :- व्हीमास एशिया ‘ मनोरंजन जगताचा वेध घेणारा आशियातील आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे . या प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून घेऊ शकता . या प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे , विविध प्रतीचे वेगवेगळ्या वयोगटांमधील आकर्षक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत . या प्लॅटफॉर्म वरील चित्रपट , मालिका , विविध शोज आणि इतर आणखी काही कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या परिपूर्ण मनोरंजनाबरोबरच त्यांना विविध माहिती देण्याचाही उद्देश आहे . चित्रपट प्रेमींसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म आता सुरू झाला आहे . जेणेकरून प्रेक्षकवर्ग पोपकॉर्न आनंद घेत चित्रपटाची ही मजा लुटू शकतील . व्हीमास एशिया यूएसपी – ‘ व्हीमास एशिया ‘ हा प्लॅटफॉर्म वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी आहे की , कोणत्याही भागातील प्रेक्षकवर्ग त्यांच्या स्थानिक भाषांमधील अमर्यादित मनोरंजनाचे कार्यक्रम अगदी सहजतेने येथे पाहू शकेल . या प्लॅटफॉर्मवरील आशयाची निवड करताना जगभरातील प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा , त्यांच्या वयोगटाचा विचार करण्यात आला आहे . त्यादृष्टीने कार्यक्रमांमध्ये विविधता आणली गेली आहे . आपल्या ग्राहकांना परिपूर्ण मनोरंजनाचा आनंद देणे यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे . व्हीमास अशिया नेटवर्क हा भारतीय उपक्रम ‘ व्हीमास एशियाशी संलग्र असून तो मनोरंजनाचा एकमेव पर्याय आहे . पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिण – पूर्व आशिया विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे . त्याचाच एक भाग म्हणून एसझापी समूहाशी जोडलेल्या भारतामधून स्थानिक भाषांमधील प्रसारणाची सुरुवात होणार आहे . व्हीमासतर्फे स्थानिक भाषांमधील विविध ब्रेड्स प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा प्रारंभ ‘ व्हीमास मराठी ‘ द्वारे होणार आहे . विशेष मराठी कार्यक्रम व्हीमास एशियातर्फे ‘ व्हीमाम मराठी ‘ या नव्या कोया प्लॅटफॉर्मचा प्रारंभ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेला पुणे शहरातून होणार आहे . मराठी तसेच स्थानिक भाषांमधील कार्यक्रमांच्या सादरीकरणामधील हे क्रांतिकारी पाऊल असून ते मनोरंजनाची व्याख्याच बदलणार आहे . व्हीमाम मराठीच्या प्रारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रामधील सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी हा प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा एकमेव पर्याय राहणार आहे . या प्लॅटफॉर्मची दणदणीत नुरुवात होत आहे . व्हीमास मराठीचा प्रारंभ झाल्यानंतर त्याचे अप्लिकेशन ही लगेचच सुरु होईल . सध्या या प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपट , वेब मिरीज , विविध शोज , लघुपट यांच्या आशयाचे हक्क मिळवण्याचे काम वेगाने सुरु आहे . मराठी माणूस नेहमीच आपल्या मनोरंजनाच्या आवडी निवडी बद्दल चोखंदळ राहिला आहे ! त्यामुळेच व्हीमाम मराठीची रचना वेगळ्या पद्धतीने केली असून त्यांना या प्लॅटफॉर्मवर नवीन मालिका , चित्रपट , लघुपट , स्थानिक ‘ भाषांमधील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . व्हीमास एशिया तर्फे केवळ मराठीच नव्हे तर हिंदी , पंजाबी , बांगला आणि गुजराती भाषांमधील प्रेक्षकांसाठीही नवीन प्लॅटफॉर्म सुरू केले जाणार आहेत .