पुणे दि १४ :- पुण्यातून बिहार कडे जाण्यासाठी रात्री पुणे रेल्वे स्टेशन येथे आलेल्या परप्रांतीय मजुरांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना थरारक पाठलाग करुन बंडगार्डन पोलीसांनी केले जेरबंद पुणे रेल्वे स्टेशन येथे बाहेर राज्यामध्ये तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशी येत असतात . त्यामध्ये मजुरी काम करणारे बाहेरील राज्यातील मजुरांचा समावेश असतो . दि १२/०३/२०२१ रोजी रात्री ०३.०० वाजताचे सुमारास उंब्रज , ता . कराड जि . सातारा या ठिकाणी मजुरी काम करणारे बिहार राज्यातील कामगार त्यांचे गावी जाणेसाठी पुणे स्टेशन येथे आले असता एका रिक्षामधुन येवून यातील सराईत आरोपी यांनी चाकु , ब्लेड चा धाक दाखवून , मारहाण करुन शिवीगाळ करुन त्यांचेकडील १० हजार१०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले असल्याने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता व पोलिसांनी सविस्तर माहिती घेऊन , बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे फिर्यादी गौतम लक्ष्मीनाथ कुमार , वय -२० वर्षे , हे त्यांचे मित्र सोनुकुमार व त्रिभुवन यांचेसह मुळ गावी बिहार येथे जाण्यासाठी कराड , सातारा येथुन बसने स्वारगेट येथे रात्री ०१.३० वाजता आले . स्वारगेट वरुन पायी चालत पुणे रेल्वे स्टेशन शेजारील स्वामी समर्थ मंदीराजवळ आले . पाय दुखत असल्याने फुटपाथ वर बसले असताना यातील आरोपी यांनी रिक्षा मधुन येवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना चाकु , ब्लेडचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली . त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र सोनुकुमार सदर ठिकाणाहुन पुणे स्टेशन चौकाकडे मदतीसाठी पळत गेले तेव्हा फिर्यादी यांना पुणे स्टेशन चौक येथे रात्रगस्त कर्तव्यावर नाकाबंदी करीत असणारे पोलीस उप निरीक्षक. राहुल पवार भेटले . तेव्हा फिर्यादी यांनी झाले प्रकाराबाबत त्यांना सांगितले असता. राहुल पवार हे रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पुणे स्टेशन मार्शल , कौंसिल हॉल मार्शल , तपास पथकातील कर्मचारी व फिर्यादी यांचेसह घटनास्थळाकडे रवाना झाले . पोलीसांना पाहुन रिक्षामधील सराईत गुन्हेगार पुणे स्टेशन कडुन विरुध्द दिशेने मालधक्का चौकाकडे पळुन जावु लागले राहुल पवार यांनी फोन द्वारे पुणे स्टेशन मार्शल वरील कर्मचारी यांना फोन वर संपर्क साधुन पुणे स्टेशन कडुन मालधक्का चौकाकडे विरुध्द दिशेने येणारे रिक्षा अडविण्यास सांगितले असता मालधक्का चौक येथे रिक्षा अडविण्यात आली त्यावेळी रिक्षामधील सराईत गुन्हेगार पळुन जावुन लागले त्यामधील आरोपी १. दिप उर्फ राजु सुखलाल सरकार , वय -२१ वर्षे , रा . कुंभारवाडा , केशवनगर , मुंढवा , पुणे २. मनोज सुरेश पराते , वय -२६ वर्षे , रा . केशवनगर ग्रामपंचायत जवळ , मुंढवा , पुणे ३ . मंगेश अशोक गव्हाणे , वय -३२ वर्षे , रा . संभाजी चौक , गुरव यांच्या घरी भाड्याने , ऑस्कर शाळेजवळ , केशवनगर , मुंढवा , पुणे यांना पाठलाग करुन ताब्यात घेतले . परंतु त्यांचे दोन साथीदार पळुन जाण्यात यशस्वी झाले असुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे . ताब्यात घेतलेल्या आरोपींकडुन रोख रक्कम व रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे व पुढील तपास. राम दळवी , पोउनि तपास पथक , बंडगार्डन पोलीस स्टेशन , पुणे शहर हे करीत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -२ . सागर पाटील , लष्कर विभागाचे सहा.पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक , गुन्हे अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक राहुल पवार , पोहवा संतोष पागार , पोशि एकनाथ सावंत , पोशि अकबर कुरणे , पोशि सागर जगताप , पोशि जाधव , पोशि जावळे यांनी केली .