पुणे शहरातील सचिन पोटे आणि अजय शिंदे यांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज मोक्कानुसार कारवाई केली आहे. आयुक्तांच्या मोक्का कारवाईने मात्र सराईत गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.सचिन निवृत्ती पोटे (वय 40), अजय अनिल शिंदे (वय 36), विठ्ठल महादेव शेलार (वय 38), अजिंक्य उर्फ अजय उर्फ अज्जू राजाराम पायगुडे (वय 28), दगडू भीमराव वैद्य (वय 36), अनुप अशोक कांबळे (वय 36), अतिक इस्माईल शेख (वय 33), मुन्ना उर्फ हेमंत मारुती कानगुडे (वय 35), बाबू उर्फ अंकुश धारू निवेकर (वय 26) आणि अमोल सतीश चव्हाण (वय 31), अशी कारवाई करण्यात आलेल्या नावे आहेत.मुंढव्यात वायकीकी टिकी लाऊंज या बड्या हॉटेलात दाम्पत्य वाढदिवस असल्याने आले होते. यावेळी सचिन पोटे, त्याचे साथीदार याठिकाणी होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. वादातून सचिन पोटे याने फिर्यादी यांच्यावर गोळीबार केला होता. हे सर्व प्रकरण 2018 सालात घडले होते. त्यावेळी मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोळीबार झाला नाहीच, असा दावा केला होता. मात्र याबाबत तक्रार आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी याप्रकरणी चौकशी करत गुन्हा दाखल करत कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजय शिंदे एकाला अटक केली होती. यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान सचिन पोटे याने संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हा करत असल्याचे समोर आले. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणी ल, जबरी चोरी असे गुन्हे दाखलआहेत . तसेच सचिन निवृत्ती पोटे यांने व त्याचे संघटीत टोळीने सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत पसरवून स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणेकरिता गुन्हे करित असल्याचे निष्पन्न झाले आहे . सदर आरोपी यांनी संघटीत टोळीच्या माध्यामातून गुन्हा केलेला असल्याने पोलीस निरीक्षक , रजनीश निर्मल , युनिट ४ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) या कलमाचा समावेश करणेबाबत अहवाल मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे . श्रीनिवास घाडगे यांचेमार्फत अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त, गुन्हे , पुणे शहर यांना सादर करण्यात आलेला होता . त्यास अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांनी मंजुरी दिलेली आहे . त्याप्रमाणे मुंढवा पोलीस स्टेशन मोक्का कायदयाची कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहे . सदर गुन्हयाचे तपास लक्ष्मण बोराटे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , पुणे शहर हे करीत आहेत . सदरची कामगिरी ही अमिताथ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे शहर श्रीनिवास घाडगे , पुणे शहर श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , पुणे शहर लक्ष्मण बोराटे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , रजनीश निर्मल , युनिट -४ , पुणे शहर , पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील , युनिट ४ , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केलेली आहे . मा . पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून व वैयक्तिक मार्गदर्शन करुन शरीरा विरुध्द व माला विरुध्द गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांविरुध्द कडक कारवाई करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर दिलेला आहे . आता पर्यंत मा . पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्विकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ ९ मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्या असून १५ एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या असून चालू वर्षामध्ये १३ मोका अंतर्गत व ८ एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आहेत .दरम्यान, अनेक नामचीन गुंड तसेच बेकायदेशीर धंदे करणारे अनेक जण पुणे पोलिसांच्या रडारवर असून पोलिस त्यांची माहिती घेत आहेत. त्यांच्यावर देखील मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी केले आहे.