परभणी दि १७ :- सोनपेठ जिल्हा परभणी येथे महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांना फोन करून आम्हास सोन्याचा हंडा सापडला आहे त्यातील सोने आम्हास विकायचे आहेत तुम्हाला अर्ध्या किंमतीत सोने देतो असे म्हणून लुटणारी टोळी सक्रिय असून काल दिनांक 16 /3/ 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्या तील रहिवासी असलेले दोन नागरिकांना असाच फोन करून सोनपेठ जिल्हा परभणी येथे बोलावून घेऊन त्यांना
मारहाण करून त्यांच्याकडील पैसे लुटले सदर प्रकरणात सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आज रोजी पोलीस अधीक्षक जयंत मीना पोलीस उपअधीक्षक राठोड साहेब पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने पोलीस नाईक महेश कवठाळे पोलीस शिपाई आनंद कांबळे महिला पोलीस किरण काळे यांनी दोन महिला नामे काळुबाई अपरंग शिंदे रा. दत्तवाडी तालुका गंगाखेड व रेखा बंडू काळे राहणार शिवाजीनगर तांडा गंगाखेड यांना दत्तवाडी शिवारातील त्यांचे शेतातील आखाड्यावर अटक अटक करून त्यांच्याकडून एक लाख 40 हजार रुपये व मोबाईल जप्त केला आहे यापूर्वी पण लातूर उस्मानाबाद हैदराबाद नाशिक सोलापूर येथील नागरिकांना कमी भावात सोने देतो म्हणून फसवण्याचे प्रकार घडले आहेत तरी परभणी पोलिसाकडून अशा प्रकारे येणारे कॉल ला कोणीही बळी पडू नये असे आव्हान केले जात आहे.
परभणी प्रतिनिधी :- प्रशांत नेटके