श्रीगोंदा दि २० :-पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्या आदेशानुसार 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींचे मनपरिवर्तनासाठी कर्जत पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच व्याख्यानमाला घेतली जात आहे. आज सकाळी ११ ते दुपारी२ या वेळेत व्याख्यानमालेस सुरूवात झाली. यावेळी परिसर भक्तिमय झाला होता. तर आरोपींचे तोंडी विठ्ठल नामाचा गजर होता.उपविभागीय पोलिस अधिकारी, अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून कर्जत पोलीस ठाण्यात व्याख्यान मालेचा कार्यक्रम घेतला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता या व्याख्यानास सुरूवात झाली. यावेळी मेळाव्यास टू प्लस टू यादीमधील ३२ आरोपी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर राहिले. हजर राहिलेल्या
आरोपींचे इंन्ट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले होते, तसेच त्यांचे ५ वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेऊन माला विरुद्ध गुन्ह्यातील आरोपी यांची इतर माहिती घेण्यात आली. आरोपी यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून ह.भ.प. माऊली महाराज पठाडे ( कीर्तनकार) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. पोलीस ठाण्यात आरोपीं नेहमीच वेगवेगळे मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. त्यांचे मनपरिवर्तन करणे, हा या मागचा उद्देश असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आयोजन केले. आतापर्यंत कारागृहात असा कार्यक्रम कोणीही आयोजित केला नसल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे ( कीर्तनकार) यांनी व्याख्यानातून प्रबोधन केले. एकदा केलेली चुक पुन्हा करू नका. एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करण्याचे पठाडे यांनी आपल्या व्याख्यानमालेत सांगितले. यावेळी सपोनि. सुरेश माने,पोसई.अमरजित मोरे व कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस अमलदार तसेच कर्जत पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील उपस्थित होते. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व आरोपी यांना भविष्यात त्यांचे हातून कोणताही गुन्हा घडू नये, जर त्यांचे हातून गुन्हा घडला तर त्यांचेवर करण्यात येणाऱ्या प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाईची त्यांना समज देण्यात आली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे