पुणे दि २२ :- महाराष्ट्र सह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहर मध्ये कोरोना चा कहर झाला असून रुग्णांचा आकडा हा वाढत आहे शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन नागरिक करत नाही त्यामुळेकोरोना चा कमी झालेला प्रादुर्भाव काही दिवसापासून आणखीन वाढत आहे.मास्क वापरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, वेळोवेळी हात धुणे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, घरी राहूनच शक्य होईल तेवढे काम करावे, असे प्रशासनाचे निर्देश असतानासुद्धा नागरिक या नियमांकडे पाठ फिरवत आहे आणि त्यामुळेच कोरोना चा प्रसार हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील एक सहा वर्षाचा मुलगा कार्तिक मोनिका धनंजय खलाने याने महाराष्ट्रातील नागरिकांना एक संदेश देणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, आपल्या या पोस्ट द्वारे कार्तिक याने नागरिकांना आवाहन केले आहे की ” घरी रहा सुरक्षित रहा “. या एवढ्या छोट्या मुलाने कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये व घरी राहूनच सुरक्षित राहावे हा मोलाचा संदेश दिला असून एवढ्या लहान वयात मोलाचा संदेश कार्तिक ने दिल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला असून नवल वाटले आहे परिसरातील नागरिक व पुणे शहरातील नागरिक कार्तिकचे कौतुक करीत आहेत.कार्तिक हा अवघ्या सहा वर्षाचा असून तो पुणे शहरातील शनिवार पेठ येथे वास्तव्यास असणाऱ्या मोनिका खलाने यांचा मुलगा असून मोनिका खलाने या वकील आहेत तसेच भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधान मतदार संघातील प्रभाग १५ च्या अध्यक्षा आहेत.व तसेच त्या ऑल इंडिया अँटिकरप्शन बोर्ड पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष ही आहेत.कार्तिक या सहा वर्षाच्या मुलाने दिलेल्या संदेशला तरी नागरिकांनी प्रतिसाद द्यावा व कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास सहकार्य करावे असे मोनिका खलाने यांनी ही सांगितले आहे.