• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
मुंबई, दि.२७ :- होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या सणावर कोविड – १९ चे सावट असल्याने घरातच राहून हे सण साजरे करा व याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकाना होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळी किंवा शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते, परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे श्री.  वडेट्टीवार यांनी सांगितले.

होळीचा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असून यामुळे जास्त प्रमाणात वायू प्रदुषण होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचाही अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करीत असून त्यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर लवकरच आपण विजय मिळवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 7090 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची टोटल आकडेवारी 8455

Next Post

ऑनलाईन मोबाईल गेमच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या मुलास कर्जत पोलिसांनी केले गजाआड

Next Post

ऑनलाईन मोबाईल गेमच्या साहाय्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या मुलास कर्जत पोलिसांनी केले गजाआड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In