पुणे दि ३० :- हल्ली फसवणुकीमध्ये सर्वात जास्त घडला जाणारा प्रकार म्हणजे सायबर क्राईम. विशेष म्हणजे अगदी हुशारातला हुशार व्यक्तीसुद्धा या फसवणुकीला बळी पडतो. आजकालची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी मग ते इन्स्टा, फेसबुक अशा साईट्सचा वापर करुन ओळख वाढवतात आणि पुढे जाऊन दुर्घटनेचा शिकार बनतात. असाच एक प्रकार काही दिवसापूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याला व काही पुण्यातील तरुण पिढीतील मुलांना संग घडला आहे. मागील काही दिवसा पूर्वी सुमारे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला एका अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला. त्याने तो व्हीडिओ कॉल उचलला .मात्र व्हिडीओ कॉल उचलताच एक मुलगी कपडे काढताना पाहून त्याला काहीच सुचलं नाही व तातडीने तो कॉल कट केला. मात्र दुसऱ्या दिवशी मोबाईल हातात घेताच तेच्या पायाखालची जमीन सरकली.दुसऱ्या दिवशी एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याच्याकडे गुगल पेवर पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढंच नाही तर जर पैसे ट्रान्सफर केले नाहीत तर त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकीही त्याला या मेसेजमधून देण्यात आली होती. त्यानंतर बड्या धाडसाने पोलिसांमध्ये तक्रार केली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीप फेक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे असे क्राईम्स होतात. अशा सर्व टोळी राजस्थानमधील भरतपूर, यूपीमधील मथुरा आणि हरियाणाच्या मेवात भागात अधिक सक्रीय आहेत, त्यामुळे अनोळखी नंबरवरुन कुणी व्हिडीओ कॉल करत असेल तर असे कॉल उचलू नका तसेच कुणी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना यासंदर्भात माहिती द्या, असं आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.