पुणे दि ०४ :- पुणे परिसरात रात्रीचे वेळी बंद दुकानांची शटर फोडून चोरी करणाया चोरटयाना चतुःश्रृंगी पोलीसांनी अटक करून त्याचेकडून एकूण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चतु : श्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये मागील काही दिवसा पूर्वी शटर उचकटून चोरी करण्याचे घटनांमध्ये वाढ झाली होती व पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त , पुणे शहर यांनी आढावा घेवून गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता व दाखल गुन्हे उघडकीस आण्या करीता चतु : श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार केले होते . त्याप्रमाणे नेमलेले पथकाने मागील काही महिण्यामध्ये झालेल्या सर्व गुन्हयांचा एकत्रित अभ्यास करून, त्याप्रमाणे तपास पथक आरोपी बाबत तपास करीत असताना पोहवा मुमुद तारु . पोना इरफान मोमीन व पोना श्रीकांत वाघवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , गणेश पतेत राहणारा सोन्या य त्याचे मित्रांनी काही दिवसापुर्वी वडारवाडी येथील एक वाईन शॉप फोडून त्यामधील रोख रक्कम चोरुन त्या पैशातुन मौजमजा करीत आहेत . त्यानुसार तपास पथकातील पोहवा तारु , पोना मोमीन , पोना याघवले , पोशि जगताप असे दोन दिवस दारुवाला पुल , गणेश पेठ येथे तळ ठोकुन होते . त्यानंतर त्यांना आरोपी नामे रवि जितेंद्र सरोदे वय २१ वर्षे रा.समर्थ हॉस्पीटलच्या पाकींग मध्ये दारूवाला पुल नाना पेठ पुणे , मुळ पत्ता मु.पो.केसेआळी लोहगांव पुणे हा मिळुन आला त्यास गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हयातील साथीदार आरोपी मंगेश उर्फ सोन्या विजय चव्हाण , वय २४ वर्षे , रा . अल्पना टॉकीज जवळ , गणेश पेठ , पुणे हा साथीदार असल्याचे सांगितले . वरील दोन्ही आरोपींकडे तपास करता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार यांनी मिळुन वडारवाडी . गोखलेनगर , सेनापती बापट रोड व विश्रांतवाडी येथे शटर फोडून कॅश काऊंट मधील रक्कमेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे . सदर आरोपींकडे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास केलेनंतर एकुण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींकडून किं.रु. २०,३०० / – चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे . तसेच सदरचे सर्व आरोपी हे पुणे शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आसून . आरोपींकडून ७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत .सदर कारवाई ही अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये. पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , महेश भोसले पोलीस अंमलदार पोहवा . दिनेश गडांकुश , मुकुंद तारू , पोना श्रीकांत वाघवले , इरफान मोमीन , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , प्रकाश आव्हाड , आशिष निमसे , ज्ञानेश्वर मुळे , सुधीर माने , पोशि अमोल जगताप व तेजस चोपडे यांच्या पथकाने केली आहे . सदर प्रकरणी पुढील अधिक तपास पोउनि मोहनदास जाधव हे करीत आहेत . तसेच व्यापारी वर्गास दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यामार्फत दुकान व समोरील रस्ता कव्हर होईल अशी रचना करणे बाबत व दुकान बंद करतेवेळी दुकानामध्ये कमीत कमी रोख रक्कम ठेवणे बाबत आवाहन करण्यात आले आहे .