पिंपरी चिंचवड दि ०६ :- लॉकडाऊन मध्ये कडक निर्बंध जाहीर होताच मद्याचा साठा करुन घेवुन जाणारे ०२ इसमांना स्वीफ्ट गाडीसह पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात सध्या देशांतर्गत कोरोना या विषाणुचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकरीता कडक उपाय योजना करणेकामी कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड शहर यांचे आदेश असल्याने आज दि . ०६/०४/२०२१ रोजी दिघी पोलीस ठाणेकडील तपास पथक हददीत कारवाईकामी फिरत असताना दु . १३/३० वा . चे सुमारास देहुफाटा चौकाकडुन च – होली फाटा चौकाकडे संशयित रित्या आलेली स्वीफ्ट गाडी नं . एम.एच .१४ / एच.डब्ल्यु . ३०९ ७ हिस थांबवुन तिची तपासणी केली असता तिचे मध्ये एकुण १० विदेशी मद्याचे बॉक्स मिळुन आले . गाडीमधील इसम नामे सुरज बाबु कांबळे वय . २३ वर्षे रा . पाटील नर्सिंग होम शेजारी , धावडेवस्ती भोसरी पुणे व सुरज संतोष मिसाळ वय , २४ रा . साई आनंदनगर , बाबाआनंद मंगलकार्यालय पुढे , धावडेवस्ती भोसरी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करता सध्या लॉकडाऊन मध्ये कडक निर्बध जाहीर झाल्याने सदरचा दारु साठा ७२ हजार रु चा विदेशी माल सोबत घेवुन जात त्यांचे ताब्यातुन स्वीफ्ट गाडी नं . एम.एच .१४ / एच.डब्ल्यु . ३० ९ ७ सह एकुण १० विदेशी मद्याचे बॉक्स असा मिळुन किं.रु. ५,लाख २२ हजार रुपयाचा माल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त . मंचक इप्पर साो . परि -१ , सहा . पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे मॅडम , चाकण विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक . मोहन शिंदे , दिघी पोलीस ठाणे , सहा.पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ , सहा.पोलीस उप निरीक्षक . राजेंद्र मोरे , पोलीस हवालदार वसंत गायकवाड , पोलीस हवालदार प्रदिप पोटे , पोलीस नाईक चंद्रकांत पोलीस नाईक गणेशभुषण गोसावी , पोलीस नाईक ज्ञानेश्वर कु – हाडे , पोलीस शिपाई विजय पाटील , यांनी केलेली आहे .