पुणे दि ०८ :-राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज ( गुरुवार ) पुण्यातील ५० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांनी आंदोलन करण्यात आले .जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालय, तहसीलदार मुळशी पौड अशी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली.
आज पुण्यातील व्यापारांनी सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात जोरात घोषणा बाजी करून सरकारचा निषेध केला. यावेळी , व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध , मेरा पेट मेरी मजबुरी , दुकान खोलना है जरूरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. व लाँकडाऊन नाही अशी हामी देणाऱ्या राज्यसरकारने अचानक लाँकडाऊनची घोषणा केली. जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता, इतर सर्व दुकानांना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत.या आदेशाविरूध्द अखिल सुसगांव व्यापारी संघटनेचा मोर्चा आज दिनांक ८ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये सर्व दुकानदार व व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानांवर लाँकडाऊनच्या विरोधात फलके लावलेली होती. या मोर्च्यामध्ये पुणे जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष. सचिन निवंगुणे, सुसगाव.व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष. भरत चौधरी , खजिनदार जयराम जी सिरवी, सहसचिव तोळाराम देवासी, व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते.
पुणे सामाजिक व राजकीय प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे