पुणे दि ११ : – पुणे शहरात रेमडिसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले असून, पुणे पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. रेमडिसिवीर हे एका रुग्णालयात नोकरी करत असलेल्या नर्स महिलेने दिले असल्याचे सांगितले आहे. पृथ्वीराज संदीप मुळीक (वय 22, दत्तनगर) व नर्स नीलिमा किसन घोडेकर (गोल्डन केअर हॉस्पिटल, भूकर चौक, हिंजवडी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना लागणारे रेमडिसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.त्याचा तुटवडा आहे. त्याचाच काहीजण फायदा घेत या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत आहेत. त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न केले आहेत.पुणे पोलिसांनी देखील शहरात वेगवेगळ्या पथकांना यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी पथक माहिती घेत असताना त्यांना दत्तनगर परिसरात एकजण या इंजेक्शनची अधिक किमतीने विक्री करत आहे. यानुसार याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने सापळा रचून मुळीक याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला हे इंजेक्शन हिंजवडी येथील भूमकर चौकात असलेल्या गोल्डन केअर रुग्णालयातील नर्स मैत्रिणीने दिले आहे. त्यानंतर तिला देखील ताब्यात घेतले आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शिल्पा चव्हाण , सपोनि.जुबेर मुजावर , पोलीस अंमलदार , निलेश शिवतरे , धनंजय ताजणे , गणेश पाटोळे , अतुल मेंगे , मॅगी जाधव , गणेश ढगे , सुमित ताकपेरे , श्रीकांत दगडे , ऋषिकेश कोळप व चेतन होळकर यांनी ही कारवाई केली आहे . सपोनि जुबेर मुजावर , पोलीस नाईक, ढगे व पोलीस शिपाई , होळकर असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार चालू असून त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोना . ढगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दत्तनगर , कात्रज , पुणे या ठिकाणी एक इसम आर्थिक फायद्याकरिता कोविड १९ या आजारावर लागणाऱ्या Remdesivir Injection ची बाटली अधिक किंमतीमध्ये विक्री करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनि मुजावर यांनी अतिश शिवाजीराव सरकाळे , औषध निरीक्षक , अन्न व औषध प्रशासन व त्यांचे सहकारी विवेक पांडुरंग खेडकर औषध निरीक्षक यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन बातमीतील आशय समजावुन सांगुन बनावट गि – हाईक म्हणून काम करणारे पोना ढगे यांना त्रिमुर्ती चौक , दत्तनगर , पुणे येथे समोर रोडचे कडेला थांबणेस सांगून संशयीताच्या लक्षात येणार नाही अशा ठिकाणी सपोनि जुबेर मुजावर व औषध निरीक्षक , पोलीस स्टाफ असे थांबलो . त्यानंतर बनावट गि – हाईक म्हणून काम करणारे पोना ढगे हे बातमीतील आशयाप्रमाणे साई प्रसाद हॉस्पीटल , दत्तनगर , पुणेचे बाहेर जावून थांबले असता , तेथे गोपनीय बातमीदाराचे सांगणेप्रमाणे एक इसम थांबलेला दिसून आला . त्यास बनावट गि – हाईक पोना ढगे यांनी कोवीड -१ ९ आजारावर लागणा – या Remdesivir Injection ची बॉटल पाहिजे असल्याचे सांगितले असता मिळालेल्या बातमीतील वर्णनाचा इसम व इंजेक्शनची बाटली असे सदर ठिकाणी आढळल्याने सदर इसमास ताब्यात गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी उपरोक्त आरोपी अटक असून अधिक आरोपी अटक होण्याची शक्यता असून अधिक मुद्देमाल जप्त होण्याची देखील शक्यता आहे . सदरची कारवाई.पोलीस आयुक्त , अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने पुणे शहरचे.अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) ,अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) , श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे १ ) , सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली झाली . Remdesivir Injection च्या होणाऱ्या काळाबाजार प्रकरणी पुणे शहर पोलीसांनी विशेष मोहिम हाती घेतली असून सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची १० पथके याकरीता कार्यान्वित झाली आहेत . असा काळाबाजार होत असल्याची कोणा नागरिकास माहिती असल्यास त्यांनी पुणे शहर पोलीसांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे . ही कारवाई पुणे शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासन , पुणे विभाग यांनी संयुक्तरित्या केली असून औषध निरीक्षक , आतिश सरकाळे यांनी फिर्याद दिली असून औषध निरीक्षक , विवेक खेडकर तसेच अन्न निरीक्षक , निलेश खोसे यांनी या कारवाईत आवश्यक ते तांत्रिक सहकार्य पुरविले आहे .