पुणे दि १६ :- पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीचा वाईन शॉप व बिअर शॉपी दुकान चालकांना फटका बसला आहे. मद्यालयातून घरपोच मद्य देण्यास परवानगी देण्यात आलेली असताना, बिअर शॉपी आणि वाईन शॉपी यांना घरपोच मद्य देण्यास परवानगी असल्याचा महापालिकेच्या १४ एप्रिलच्या आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे एकाच व्यवसायात असूनही भेदभाव का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार पुणे महापालिके कडूनही निर्बंधांबाबत सुधारित आदेश देण्यात आले आहेत.
महापालिके च्या १४ एप्रिलच्या आदेशात ‘रेस्टॉरंट, हॉटेल्स, बारद्वारे पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील. हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही’ असे नमूद करण्यात आले आहे. तर ९ एप्रिलच्या आदेशात ‘महापालिके च्या क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहतील’ असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १४ एप्रिलच्या आदेशात मद्यविक्रीबाबतचा स्वतंत्र उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला. महापालिके च्या १४ एप्रिलच्या आदेशात मद्यालयांतून घरपोच मद्य देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र वाईन शॉपी आणि बिअर शॉपीमधून घरपोच मद्य देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. वास्तविक ९ एप्रिलच्या आदेशात घरपोच मद्यविक्रीला परवानगी असल्याचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे मद्यालयांना घरपोच मद्य देण्यास परवानगी असेल, तर वाईन शॉपी आणि बिअर शॉपीला घरपोच मद्य देण्यास परवानगी का नाही असा प्रश्न आहे. एकाच व्यवसायात असूनही मद्यालये आणि बिअर शॉपी, वाईन शॉपी यांत भेदभाव का के ला जातो, असा प्रश्न वाईन शॉपी आणि बिअर शॉपी चालकांनी उपस्थित के ला आहे.मद्यविक्रीच्या परवानगीबाबतचे सुधारित आदेश पुणे महापालिके कडून दिले जातील. – विक्रमकुमार, आयुक्त, पुणे महापालिका