कर्जत दि.१७:-सध्या राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. यासाठी कर्जत पोलीस प्रशासनाने व नगरपंचायत यांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत कर्जत शहरात ही कारवाई केली जात आहे.कर्जत शहरात काही बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून कर्जत पोलिसांनी ही नामी शक्कल लढवली आहे.
राज्यात कोरोना आटोक्यात यावा, यासाठी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे आज कर्जत शहरातील बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. मात्र तरीदेखील बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिस व नगरपंचायतकडून कारवाई केली जात आहे. जे नागरिक विनाकारण आणि विनामास्क फिरत आहे. त्याची तिथेच रॅपिड टेस्ट केली जात आहे. पोलीस, आरोग्य विभाग आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे. या कारवाईतंर्गत आतापर्यंत एक जण कोरोना पॉझीटिव्ह निघाला असुन त्याची विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
ही कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव तसेच पोलीस कर्मचारी, नगर पंचायतचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे