पिंपरी चिंचवड दि २२ :- एमआयडीसी भोसरी परिसरात मॉर्निंग वॉकचे नावाखाली विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ७० नागरीकांवर एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई संपुर्ण जगात कोराना सारख्या भंयकर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याला आटकाव करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करुन सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकचे नावाखाली विनाकारण पीसीएनडीटीए सर्कल , मोशी प्राधिकरण मोशी पुणे येथे फिरणाऱ्या एकुण ७० नागरीकांना एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना कोरना विषाणुचे गांभिर्य समजावुन सांगुन तसेच लॉकडाऊनचे महत्व समजावून सांगुन त्यांचेवर एमआसडीसी भोसरी पोलीसांनी कारवाई करुन त्यांचेकडुन एकुण ३५ हजार रुपये दंडवसुल करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन सोडुन देण्यात आले आहे . सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , कृष्ण प्रकाश सो.अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे.पोलीस उपायुक्त मंचक इप्पर परि -०१ ,सहाय्यक पोलीस आयुक्त.डॉ.सागर कवडे सो . MIDC भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. शिवाजी गवारे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) प्रदिप पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक अमोल डेरे , पोलीस अंमलदार दिनेश मुंडे , पुना हगवणे , जयदीप खांबट , सागर कोळी , सुनिल कोळी यांचे पथकाने केली आहे .