कर्जत दि २४ :-कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस प्रशासन महिला रुग्णाबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत आहे.महिलांची सुरक्षा जपण्यासाठी अशा कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज ओळखून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला आहे.
गेले दीड वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लोकांना होत असून पुरुष तसेच महिला रुग्ण हे कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होतात. काही जिल्ह्यातील सेंटरमध्ये महिला रुग्णांना त्रास झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कर्जत पोलिस हे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाय योजना करण्यासाठी तत्पर असतात. त्याच धर्तीवर कोविड केअर सेंटर गायकरवाडी, तालुका कर्जत तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हीड केअर सेंटर अशा दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवने सुरू आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळणार आहे, सुरक्षित वाटणार आहे. सरकारच्या सुद्धा त्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत.महिलांची सुरक्षा जपण्यासाठी अशा कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
सदरचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे हे शरद मुळे यांचे सिद्धांत एंटरप्रायसेस यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहनवरून जोपर्यंत कोविड केअर सेंटर सुरु आहे तोपर्यंत ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच सदर कोव्हिड सेंटर परिसरात पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून महिलांना काही तक्रार असल्यास तात्काळ त्यांना कर्जत पोलिसांची संपर्क करता येईल. गायकरवाडी येथे महिला रुग्ण ऍडमिट असलेल्या इमारतीत ५ व उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये ७ कॅमेरे बसविले आहे
.श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे