बुद्ध पौर्णिमा निमित्त लामा फेरा मोनेस्ट्री मध्ये ‘महाबोधी ध्यान’ सत्र
आत्मिक ध्यानाने होणार स्वतःची ओळख; त्यातूनच साधाणार लोककल्याण- डॉ. सत्येंद्र शुक्ला (लामा)
पुणे, दि २६ : – लोककल्याण करण्यासाठी प्रथम स्वतःला त्या योग्य बनवणे महत्त्वाचे आहे. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम स्वतःची ओळख आपल्या आचार, विचार आणि जीवनातून जगाला करून दिली त्यामुळे आज त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन असंख्य जन त्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतात. बुद्धांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या लामा फेरा हिलिंग प्रक्रियेद्वारे शरिरातील पंचतत्व संतुलन केली जातात. शारिरीक मानसिक बाधा पासून मुक्ताता याद्वारे केली जाते. सदैव निरोगी राहण्यासाठी नियमित ध्यान करण्याची आवश्यकता आहे असा आरोग्य मंत्र या वेळी डॉ. शुक्ला यांनी दिला.
बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने डॉ. सत्येंद्र शुक्ला द्वारे भारतातील सर्वात मोठ्या लामा फेरा मोनेस्ट्री मध्ये ‘महाबोधी ध्यान’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ध्यानाचे महत्त्व आणि त्याचे फायदे यावर देखील प्रकाश टाकण्यात आला. या वेळी अंतरराष्ट्रीय लामा फेरा हिलिंग ऑण्ड ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, स्थानिक नगरसेवक नाना भानगीरे, ममता फाउंडेशनचे पदाधिकारी, लामाज व बुद्ध विचाराचे अनुयायी उपस्थित होते.
वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते. यंदाच्या वर्षी २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली गेली. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते.