पुणे दि २८ :-पाषाण परिसरात दीड तासात सोन साखळी चोरट्यांनी पाषाण परिसरात धुमाकूळ घालत सुतारवाडी व बालाजी चौक येथे दोन महिलांच्या गळ्यातील 2 लाख रुपयांच्या सोन साखळ्या हिसकावून नेल्या. यामुळे पुन्हा सोन ,साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्ती असे वर्णन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 24 वर्षीय महिला भाच्यासोबत दुचाकीवरून घरी येत होत्या. यावेळी त्या सुतारवाडी येथे आल्यानंतर पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यानी फिर्यादी यांच्याजवळ येत गळ्यातील 1 लाख 10 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावली अन पळ काढला.
महिला दुचाकीवरून पडतापडता वाचली. त्यांनी आरडाओरडा केला. पण, सुसाट दुचाकीवर पसार झाले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतला पोलीस इकड त्या चोरट्याचा शोध घेत असतानाच पाषाण कडून बालाजी चौकात जात आसताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी डाव साधत आणखी एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली. याबाबत 40 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. फिर्यादी या पाषाण बालाजी चौक भागात राहतात. त्या साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोपेडवरून घरी जात असताना बालाजी चौकातील एन.आय.व्ही प्रयोग शाळेच्या समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या सोन साखळी चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली आहे. यात देखील अचानक प्रकार घडल्याने फिर्यादी या घाबरून गाडीवरून खाली पडत होत्या. अधिक तपास पो.उप.निरी, मोहन जाधव, व सहा.पोलिस.निरीक्षक ,संतोष कोळी करत आहेत.