पुणे दि ०३ :- बहुतांश महिलांमध्ये लोह ची कमतरता असते .त्यामुळे पुणे शहरातील झोपडपट्ट्यातील तसेच गरीब व गरजू महिलांसाठी भाजपा लवकरच शहरभर लोह तपासणी व त्यावरील गोळ्या ,औषध वाटप मोहीम राबविणार असल्याचे आज अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष भीमराव साठे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उदघाटन प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले . पुढे ते म्हणाले की ,पुणे शहरात झोपडपट्टया जास्त आहेत .शिवाय काबाडकष्ट करणाऱ्या महिलांची संख्या ही जास्त आहे .याचा विचार करून भारतीय जनता पार्टी पुणे शहरात आरोग्य शिबीर व वस्त्यावस्त्यात जाऊन महिलांना लोह तपासणी व औषध मोफत देणार आहे .या वेळी अप्पर इंदिरानगर येथे भीमराव साठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ,तसेच मोफत अन्याधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
आमदार माधुरी मिसाळ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रभाग सीसीटीव्ही युक्त केल्याबद्दल स्थानिक नगरसेविका सौ.वर्षाताई साठे व भीमराव साठे यांचे अभिनंदन केले .शहरात सर्वत्र वस्त्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दीपप्रज्वलन केले .या कार्यक्रमास आमदार माधुरी मिसाळ ,प्रदेश सचिव अमित गोरखे ,आमदार सुनील कांबळे ,नगरसेविका वर्षा साठे ,भीमराव साठे ,नगरसेवक राजेंद्र शिळीमकर ,संघटक सरचिटणीस राजेश पांडये ,विकास लवाटे ,संजय साष्टे ,स्वप्नील मार्कंड,दीपक वायकर ,अविनाश कुलकर्णी व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.