पिंपरी चिंचवड दि १८ :- वाकड येथील स्पंदन हॉस्पिटलमधील मेडीकलमध्ये काही लोक घुसन त्यांनी पोलीस असल्याचे सांगुन एमटीपी किटची कारवाई करण्याची धमकी देवुन गर्भपाताच्या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तसेच पोलीस असल्याचे सांगत सहा जणांनी मिळून एका मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. तसेच मेडिकल व्यवसायिकाकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी (ता. 15) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
अशोक बेलिराम आगरवाल (वय 53, रा. विकास नगर, किवळे) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय 32), राहुल छगन लोंढे (वय 24), प्रकाश मधुकर सजगणे (वय 31, तिघे रा.अष्टविनायक कॉलनी, वाकड), प्रीतेश बबनराव लांडगे (वय 30, रा. प्रभात कॉलनी, वाकड), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डांगे चौकात स्पंदन मेडिकल आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. तसेच, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले.दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.
या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे असे कोणीही पोलीस आले नाहीत. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून पाच जणांना पकडत मोटारीत बसविलेल्या व्यावसायिकाची सुटका केली.दोन आरोपी फरारी झाले होते. त्यापैकी एकाला रात्री अटक केली. आरोपी आकाश हारकारे हा होमगार्ड तर आरोपी प्रितेश लांडगे हा ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य असल्याची चर्चा आहे. होमगार्ड आणि ग्राम सुरक्षा दलाचा जवान असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.एमटीपी म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या आहेत. ज्या डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय देता येत नाहीत. सरकारने या गोळ्यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याचा फायदा घेत काही मेडिकल दुकानदार जादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने अवैध गर्भपातासाठी या गोळ्या चढ्या किमतीने विकतात. याचाच गैरफायदा घेत आरोपींनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे पोलीस आयुक्त . कृष्णप्रकाश , अपर पोलीस आयुक्त. रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त परि -२ . आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विवेक मुगळीकर याचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक गुन्हे -१. संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे -२. सुनिल टोणपे , सपोनि . एस . एम . पाटील , सपोनि , अभिजीत जाधव , पोउनि . अशोक जगताप , पोलीस अमलदार विजय वेळापुरे , दिपक भोसले , बापुसाहेब धुमाळ , राजु काळे . वंदु गिरी , विक्रम कुदळ , विजय गंभीरे , प्रमोद कदम , दिपक साबळे , सुरज सुतार , तात्या शिदे , कौतेय खराडे यांनी केली .