पुणे दि २३ :- पुणे परिसरात झोमॅटो आणि स्वीगीची डिलिव्हरी करता करता पाळत ठेवून रस्त्याने एकट्या दुकट्या जाणार्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना पुणे शहर हडपसर पोलिसांनी अटक केली.त्यांच्या ताब्यातून 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सिद्धलिंग जाधव (वय 23), विजय जगन्नाथ पोसा (वय 22) आणि साहिल अनिल गायकवाड (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी केलेले मंगळसूत्र चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी जवळपास 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा माग काढला.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विठ्ठल भाडळे (वय 60) या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात गळ्यातील मंगळसूत्र दोन्ही पाणी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याबाबत तक्रार दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. हा गुन्हा घडला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता तिघांनी या महिलेचा पाठलाग करून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.तसेच आरोपींनी त्यांच्या गाडीवर झोमॅटो डिलिव्हरीची बॅग लावलेली असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी या परिसरातील पाचशेहून अधिक सीसीटीवी पुढील तपासले असता आरोपी दुचाकीने चंदननगर, खराडी पर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी शेवाळवाडी परिसरात सापळा रचून वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सुरुवातीला त्यांनी झोमॅटोची डिलिव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिप या सोसायटीमध्ये गेल्यानंतर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. हा गुन्हा केल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारे सोनसाखळी चोरीचा गुन्हा केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहे . सदरची कामगिरी ही .नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .