पुणे दि २३:-पुणे शहर परिसरात वारज्यातील पोलिसांच्या पथकावर सुमारे सव्वाशे पेक्षा जास्त जणांच्या जमावाने केला हल्ला जमावाने पोलिसांच्या बातमीदाराचा खून करण्याचा प्रयत्न करत पोलिसांना देखील बेदम मारहाण केली आहे. यामुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वारज्यातील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. काल (मंगळवार) रात्री हा प्रकार घडला आहे. मात्र, गुन्हा आज दाखल झाला आहेयाप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे (वय 33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार सव्वाशे ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत दगडे यांची गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात नेमणूक आहे.
दरम्यान, ते व त्यांचे सहकारी ऋषिकेश कोळप हे वारजे परिसरात पेट्रोलिंग करीत जाताना यावेळी त्यांना त्यांच्या गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अभिजित खंडागळे याच्याकडे गावठी पिस्तुल आहे. तसेच तो साथीदारासह जबरी चोरी करणार आहे. तो राहण्यास म्हाडा कॉलनी इमारत दोन येथे चौथ्या मजल्यावर राहतो. त्यानुसार ही माहिती फिर्यादी यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली. तसेच एका मित्रालासोबत घेऊन बातमीदार व संबंधित पोलीस म्हाडा कॉलनी येथे गेले. त्यांनी गाडी पार्क केली. तसेच चौथ्या मजल्यावर बातमीदाराला घेऊन गेले.होते व तेथे अभिजित याच्या रूमचे दार वाजवले आणि महिलेला अभिजित याच्याबाबत विचारपूस करत चौकशी केली. महिलेने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले. तोपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला. यामुळे फिर्यादी यांना संशय आला. ते बातमीदाराला सोबत घेत खाली आले. यावेळी मात्र इमारती खाली मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. त्यातील काहींनी बातमीदाराकडे पाहत तू आमच्याबाबत पोलिसांना माहिती देत असतो, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने त्याला मारहाण केली. यात त्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला आम्ही पोलीस आहोत असे सांगूनही जमाव ऐकत नव्हता. यामुळे फिर्यादी व त्यांचे सहकारी त्याला वाचवण्यामध्ये पडले असता त्यांनाही जमावाने बेदम मारहाण केली. या जमावातून वाट काढत या कर्मचाऱ्यांनी बातमीदाराला बाहेर काढले. पण, त्याला गंभीर मार लागल्याने तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी त्याला विचारले असता त्याने या जमावतील 27 जणांना ओळखत असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना त्यांची नावे दिली. या प्रकारात दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नाही. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.