मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मुळे प्रभाग 13 तिसऱ्या लाटेशी सामना करण्यास सज्ज
पुणे दि १३ :- कोरोनाच्या संकटाचा सामना करताना सुरुवातीला नेमके कसे लढावे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते मात्र त्यातून शिकून दुसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करता आला आणि आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत, हे ह्या लढ्यातील लोकसहभागा मुळे शक्य झाले असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.ह्या लढयात प्रभाग 13 मधील कार्यकर्त्यांचे कार्य आदर्शवत असून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर ची व्यवस्था केल्याने प्रभाग या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असल्याचे ही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने नुकतीच भागीरथी लहान मुलांच्या रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अंजली पाटील, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजप पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसूले, ह्या प्रकल्पाचे समन्वयक वा प्रभाग 13 चे सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, स्वीकृत सदस्य ऍड. मिताली सावळेकर, उद्योग आघाडी चे रामदास गावडे वा इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी फाउंडेशन ने केलेल्या कार्याची माहिती दिली. यात विविध माध्यमातून प्रभागात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, सार्वजनिक ठिकाणी वा काही सोसायट्यामध्ये हँड्स फ्री सॅनिटायझर स्टँड वाटप यासह शहरातील दुर्लक्षित गरजूना किराणा किट, आरोग्य किट वाटप यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात प्रामुख्याने दिव्यांग, मतिमंद, तृतीयपंथी, कीर्तनकार,रुग्णवाहीका चालक,शववा हीका चालक, बॅक स्टेज आर्टिस्ट, लोकाकलावंत, पौरोहित्य करणारे गुरुजी यासह विविध घटकांना किराणा सामान वा इतर मदत करण्यात आली.त्याच मालिकेत मुकुलमाधव फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. डॉ. प्रमोद पाटील यांनी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरचा उपयोग गरजू रुग्णांसाठी करू असे सांगतानाच ह्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत, निलेश गरुडकर यांनी संयोजन तर ऍड. प्राची बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.