पुणे दि १३ :- लग्ना साठी पुण्यातुन सासवड येथे चाललेली नवरी मुलगी अतिउत्सव अगंलठ लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला अतिउत्साह अंगलट आला आहे. दिवे घाटात नवरी मुलगी चक्क स्कार्पिओ गाडीच्या बोनेटवरून बसून फोटो आणि व्हिडीओ काढत होती आणि त्याचाच व्हिडीओ शोशल मिडीया वर व्हायरल झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी मात्र काही तासातच नवरी मुलीचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला आहे.याप्रकारे नवरी मुलीचे वय 23, राहणार भोसरी व इतर तिघे आणि स्कार्पिओमधील इतर दोन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात IPC 269, 188, 279, 107, 336, 34 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड उपाय योजना 2020 चे कलम 11 मो.व्हॅ.अॅक्ट 119/177,184 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.नवरी मुलगी वय 23, राहणार भोसरी हिचा आज सासवड येथे विवाह आहे. त्यासाठी ती आणि तिचे नातेवाईक भोसरीमधून स्कार्पिओतून सासवड येथे जात होते. यावेळी त्यांनी दिवे घाटात आल्यानंतर फोटो शूट केले. पण, त्यांचे हे फोटो शूट करत असताना गाडीच्या बोनेटवर बसून, काही अंतर जात असतानाचा फोटो देखील काढला. हे फोटो सेशन सुरू असताना मात्र कोणीतरी त्याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला आणि तो व्हायरल केला. हया व्हिडिओने पुण्यात खळबळ उडाली. लागलीच लोणी काळभोर पोलिसांनी या व्हिडीओचा शोध घेण्यास सुरुवात केली.त्यानंतर काही तासात समजले की नवरी मुलगी जात असताना हे घडले आहे.
त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आज विवाह असल्याने पोलिसांनी त्यांना तोंडी कारवाईची माहिती दिली आहे. विवाह झाल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.