पुणे दि १५ :- पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गुरूवार दि १५ रोजी रात्री निर्गमित केले आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये लोणीकंद आणि विमानतळ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –
- प्रताप विठोबा मानकर (व.पो.नि.
लोणीकंद पो. स्टे. ते वाहतूक विभाग) - भरत शिवाजी जाधव (गुन्हे शाखा ते व.पो.नि. विमानतळ पो.स्टे.)
- गजानन दत्तात्रय पवार (व.पो.नि. विमानतळ पो.स्टे ते लोणीकंद पो.स्टे.)
- शबनम निजाम शेख (नियंत्रण कक्ष ते म.न.पा. अतिक्रमण)
पोलिस अधिकार्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने या बदल्या करण्यात आल्या आहेत.