पुणे : – आजारी पतीला बरे करण्यासाठी आलेल्या मांत्रिकाने त्याच्याच पत्नीला गुंगीचे पेय देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला.या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनुस शेख(वय ४५,रा.कोंढवा सध्या रा.लक्ष्मीनगर येरवडा) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.आहे व या मांत्रिकाला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकिल अँड.वामन कोळी यांनी तपास कामी मांत्रिकाला पोलिस कोठडीची मागीतली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी आरोपीला १३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पिडित महिलेचे पती अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे पत्नीने पतीच्या उपचारासाठी त्याच्या घरी नेले. त्याने घरी पतीवरुन लिंबु कापुर यांचा उतारा टाकून त्याच्या अंगात भुतबाधा झाली असून त्यासाठी त्या महिलेला गुंगीचे पेय देऊन बेशुद्ध करुन बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीला बरे करण्यासाठी वेळोवेळी उतारे व जादूटोणाकरण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी शब्बीर शेख याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस.एस.मगदूम करीत आहेत.