पंढरपूर,दि.19 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.