पुणे, दि.२७ :- घराचे इंटेरियर डेकोरेशनेचं काम व्यवस्थित झाले नाही म्हणत पुणे शहर पोलीस दलातील वाहतुक शाखेचे एका पोलीस निरीक्षकाने इंटेरियर डेकोरेटरच्या डोक्याला पिस्तुल लावून दिलेले पैसे परत मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलीस निरीक्षक वाहतुक शाखेत कार्यरत असून त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश पुराणीक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दिली आहे. राजेश पुराणीक यांनी कानाखाली पिस्तूल लावून मारहाण केली. तसेच कुटुंबीयांचाही मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. राजेश पुराणिक हे समर्थ वाहतूक विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुराणिक हे रहात असलेल्या नाना पेठ परिसरातील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम करण्यास दिले होते. घराचे 70 टक्के काम पूर्ण झाल्यावर पुराणिक यांच्याकडे कामगारांचे पैसे देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी पुराणिक यांनी कामामध्ये त्रुटी (किरकोळ चुका) काढल्या. तसेच काम व्यवस्थित झाले नसल्याचे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. तसेच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. ते आठ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे धमक्या तसेच पैशांची मागणी करत आहेत असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.. तसेच कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देत आहेत.
दरम्यान, पुराणिक यांनी ओझा यांना समर्थ वाहतुक विभागात सर्व कागदपत्रे घेऊन बोलावले.त्याठिकाणी पैसे दिले नाहीत म्हणून बुटाने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.. यानंतर डोक्याला पिस्तूल लावून दम देत कागद पत्रांवर सही घेतली. मोबाईल बळजबरीने घेऊन संपर्कातील व्यक्तींना चुकीचे संदेश पाठवले. याप्रकरणी कार्तिक ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन पोलीस
निरीक्षक (वाहतूक विभाग) राजेश पुराणिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.