• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/07/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

भविष्यातील गरज ओळखून वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाला वेग द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.३०.: -शहरी व ग्रामीण भागात सर्व वर्गवारी मधील वीज जोडण्यांची मागणी वाढत आहे. सोबतच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यकालीन गरज ओळखून तात्काळ वीजजोडण्या देण्यासाठी व दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले.येथील विधान भवनात आयोजित जिल्हा विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. निर्मला पानसरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर सौ. माई ढोरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, अशोक पवार, राहुल कुल, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे परिमंडल) व सुनील पावडे (बारामती परिमंडल) तसेच समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री प्रवीण शिंदे, प्रदीप कंद, अरूण बोऱ्हाडे, रवींद्र गायकवाड, स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्युतीकरणाच्या विस्ताराचे समन्वय, पुनर्विलोकन करणे, वीज पुरवठ्याची गुणवत्ता व ग्राहकसेवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी चर्चा करणे आदींसाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आमदारांसह इतर लोकप्रतिनिधी व विभागप्रमुख तसेच ग्राहक प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश आहे.समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दयांच्या अनुषंगाने सूचना देत जिल्ह्यातील वीजविषयक कामांचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी सद्यस्थितीत ओव्हरहेड असलेल्या लघुदाब वीज वाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य द्यावे. आमदार निधीमधील विविध कामांच्या अंदाजपत्रकांच्या मंजुरीची कार्यवाही वेगवान करण्यासाठी महावितरणने नोडल अधिकारी नेमावा. तसेच विविध योजनांतील वीज यंत्रणेची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदारच झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. विद्युत अपघात टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील धोकादायक वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.मुख्य अभियंता व समितीचे सदस्य सचिव सचिन तालेवार यांनी पुणे जिल्ह्यातील वीजविषयक विविध योजनांचे सादरीकरण केले. कृषीपंप वीज धोरणानुसार आतापर्यंत कृषिपंप ग्राहकांनी भरलेल्या थकीत व चालू वीज बिलांचा ६६ टक्के म्हणजे ११९ कोटी ९० लाख रुपयांचा कृषी आकस्मिक निधी पुणे जिल्ह्यात जमा झाला आहे. तसेच महानगर प्रदेश वीज वितरण प्रणाली सुधारणा योजना- ८२ कोटी, जिल्हा नियोजन विकास समिती निधी – ४४ कोटी, एमआयडीसी विकास आराखडा- ७३ कोटी ३४ लाख, अनुसूचित जाती, जमाती मतदार संघ प्रस्तावित विकास आराखडा- ७१ कोटी २४ लाख, शहर बिगर कृषी विकास आराखडा- १२० कोटी तसेच डोंगरी विकास आराखड्यामध्ये ९ कोटी ८२ लाख रुपयांच्या वीजयंत्रणेची कामे प्रस्तावित असल्याची माहिती दिली.या बैठकीत लोकप्रतिनिधी तसेच समितीच्या अशासकीय सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्या संदर्भात मुख्य अभियंता श्री. तालेवार व श्री. पावडे यांनी निवेदन करीत प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी पुणे जिल्ह्यातील महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

येत्या चार दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागा

Next Post

7 ऑगस्टपासून दर शनिवारी न्यायालयाचे कामकाज बंद राहणार

Next Post

7 ऑगस्टपासून दर शनिवारी न्यायालयाचे कामकाज बंद राहणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist