नवी दिल्ली, दि.३१:- मध्य प्रदेशच्या छतरपुरमध्ये ऑनलाइन गेम एका मुलासाठी यमदूत ठरला. ऑनलाइन गेममध्ये कथितप्रकारे 40 हजार रुपये गमावल्यानंतर 13 वर्षीय मुलाने फाशी लावून आत्महत्या केली. पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) शशांक जैन यांनी सांगितले की सहावीच्या एका मुलाने शुक्रवारी दुपारी आपल्या घरात फास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने लिहिले आहे की, त्याने आईच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले आणि हे पैसे ‘फ्री फायर’ गेममध्ये बरबाद केले विद्यार्थ्याने आपल्या आईची माफी मागत लिहिले आहे की, नैराश्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलाने जेव्हा हे पाऊल उचलले तेव्हा त्याची आई आणि वडील घरी नव्हते. त्याची आई राज्याच्या आरोग्य विभागात नर्स आहे आणि घटनेच्या वेळी हॉस्पिटलमध्ये होतीत्यांनी सांगितले की, पैशांच्या व्यवहाराचा मुलाच्या आईच्या फोनवर मेसेज आला, ज्यानंतर आई आपल्या मुलाला ओरडली होती. यावर मुलाने खोलीत स्वताला बंद केले. काही वेळानंतर त्याची मोठी बहिण तिथे पोहचली तेव्हा तिला खोली बंद दिसली आणि आतून कडी लावलेली असल्याचे आढळले. तिने ताबडतोब आई-वडिलांना कळवले.त्यांनी सांगितले की, खोलीचा दरवाजा तोडला असता मुलगा पंख्याला लटकलेला दिसला. यापूर्वी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्याच्या ढाणा भागात सुद्धा असाच प्रकार समोर आला होता. एका वडीलांनी ‘फ्री फायर’ गेम च्या व्यसनाधिन मुलांकडून मोबाइल फोन हिसकावून घेतल्याने त्या 12 वर्षीय मुलाने फास लावून आत्महत्या केली होती.