श्रीगोंदा, दि. ०१ :- मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील कुळधरण येथून अटक केली आहे.लल्या हरदास भोसले (रा.गणेगाव ता.शिरुर जि. पुणे)असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मोक्का गुन्ह्यात दोन वर्षांपासून लल्या हरदास भोसले हा फरार होता.नाजुका माळशिखऱ्या भोसले रा.राहींजवाडी, काष्टी ता. श्रीगोंदा हिने दिलेल्या फिर्यादिवरुन त्याच्या इतर साथीदारांना अटक केली होती.परंतु लल्या भोसले हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पोलीसांना गुंगारा देत होता.फरार आरोपी लल्या हरदास भोसले हा (कुळधरण ता.कर्जत) परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती.त्यानंतर सापळा रचून लल्या भोसले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.लल्या भोसले हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दौंड, श्रीगोंदा, शिरूर, सासवड पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.पुढील कारवाई ही श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सफौ.अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले,पोका प्रकाश मांडगे,पोकॉ किरण बोराडे,पोकाँ दादा टाके यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे