पुणे,दि.०३ : -कोरोना लॉकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्याने अनेक रिक्षाचालक काकांवर उपासमारीची वेळ आली होती.दोन वर्षे लॉकडाऊन काळानंतर देखील व्यवसाय पूर्वपदावर येताना दिसत आहे,यातच रिक्षांचे हप्ते घरखर्च त्यामुळे अनेक रिक्षाचालक काटकसरीचे जीवन जगत असून भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी पुणे शहराच्या वतीने हीच बाब लक्षात घेऊन गगनगंगा परिसरातील गरजू रिक्षा चालकास सीएनजी गॅस कुपनचे वाटप करण्यात आले.नगरसेविका मानसी देशपांडे, भाजप चित्रपट कामगार आघाडी पुणे शहराध्यक्ष रोहन शेट्टी यांच्या हस्ते कूपन वाटप केले.प्रियंका शेंडगे,शिंदे,प्रेमाशेट्टी,
अॅड.निखील लीमये,मयूर हुडे, नंदिनी पुरंदरे,अॅड.सुरज मादेवाड आदी उपस्थित होते.