पुणे ग्रामीण, दि.०६:- लातूर ते मुंबई एसटीने प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करुन 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाटस येथे 3 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 54 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी 72 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.रामदास भाऊसाहेब भोसले (वय-30 रा. वरुडे, ता. शिरुर), तुषार बबन तांबे (वय-22 रा. वरुडे, ता. शिरुर), भरत शहाजी बांगर (वय-36 रा. गणेगाव खालसा, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हितेंद्र बाळासाहेब जाधव(रा. वाघोशी, ता. फलटण जि. सातारा) यांनी यवत पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोलापूर-पुणे महामार्गावर एसटी बसला गाडी आडवी मारुन बस थांबवली. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना बसमधून खाली उतवरले. फियार्दी यांना मारहाण करुन व दमदाटी करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख. अपर पोलीस अधीक्षक . मिलिंद मोहीते , उप विभागीय पोलीस अधिकारी. राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक . पद्माकर घनवट यांना गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक. पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहा . पोलीस निरीक्षक. सचिन काळे , पोलीस उप निरीक्षक. शिवाजी ननवरे , सहा . फौज.पंधारे , शब्बीर पठाण , पो.हवा.राजू मोमीन , जनार्दन शेळके , अनिल काळे , रविराज कोकरे , पो.ना. अजित भुजबळ , मंगेश थिगळे , विजय कांचन , गुरू जाधव , पो.कॉ.धिरज जाधव , बाळासाहेब खडके , चा.पो.कॉ.दगडू विरकर , काशीनाथ राजापूरे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केलेले होते .या प्रकरणाचा यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करत होते.स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असताना तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपींची माहिती मिळाली.या गुन्ह्यातील आरोपी रामदास भोसले हा खराडी बायबास येथे असून तो साथीदारांसह पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी बायपास येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तुषार तांबे याच्याकडून 1 लाख 50 हजार तर भरत बांगर याच्याकाडून 30 हजार रुपये जप्त केले. तसेच रामदास भोसले याने उसाच्या शेतात लपवून ठेवलेले 91 लाख 3 हजार 40 रुपये व सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, बुलेट ज्युपिटर असा एकूण 1 लाख 54 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हा घडल्यापासून 72 तासात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी भरत बांगर हा रामादास भोसले याच्या बहिणीचा पती आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.